लहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? ) पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.
एकदा अकाउंट उघडला की मग मेल मधे स्पॅम मधे कुठल्या गोष्टी येतात हे इथे जास्त इलॅबोरेट करून सांगत नाही- कारण सगळ्यांनाच ते माहिती आहे. आपण मॅच्युअर्ड लोकं ते डिलिट करतो, मुलं ते पहातात!! अर्थात त्या साठी मी मात्र मुलांना दोष कधीच देणार नाही, कारण त्यांचं ते वयच असतं अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचे .एकदा इ मेल अकाउंट उघडला की मुलं बाहेरच्या जगाला गरज नसतांना एक्स्पोझ होतात. बरेच ईंटरनेट शार्क्स फिरत असतातच अशा मुलांना जाळ्यात पकडायला.
एवढ्या कोवळ्या वयात मुला मुलींना नेट वर एक्स्पोझ करण्याचे काहीच कारण नाही. १३- १४ वय असतं मुलांचं. या वयात ’त्या’ गोष्टी पहाव्याशा वाटणं साहजीकच आहे, आणि चान्स मिळाला की ते पहाणारच. मग शाळेतला एखादा फ्रेंड त्या साईटची लिंक देतो आणि मुलगा एकदम गरज नसतांना ’मोठा’ होतो. पालकांनी एकदा नेट असेस दिला की संपलं सगळं. सुरुवातीला वडीलधारी माणसं समोर असतात, तेंव्हाच नेट लावायचं, हा दंडक असतो, पण लवकरच मग मुलं एकटॆ असतांना पण नेट लाउन टाइम पास (!) करीत बसतात.
१३- १४ वर्षांची मुलं ऑर्कुट ,फेस बुक वगैरे सोशल साईट्स वर रजिस्टर करतात . कितपत योग्य वाटतं हे? प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय, कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे . इंटरनेट जंकी! दुर्दैवाने ही गोष्ट घरच्या लोकांच्या लक्षात येत नाही- आणि जेंव्हा येते तेंव्हा वेळ गेलेली असते .ही काल्पनिक गोष्ट नाही, कृपया नोंद घ्या- माझ्या परिचितांच्या मुलाच्या बाबतीत झालंय हे, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलंय .
बरेच पालक हे मुलांना इंटरनेटची सवय (?) व्हावी म्हणून ऑनलाइन खेळ खेळू देतात. त्याच सोबत कधी मुलगा खेळणं बंद करुन चॅटींग आणि सोशल साईट्सच्या आहारी जातो हे घरच्यांच्या लक्षात पण येत नाही.काही पालक मोठी इंटरेस्टींग कारणं सांगतात, मुलांना नेट वर जाऊ द्यायची, त्यातली काही खाली देतोय बघा :-
१)जसे होमवर्क दिलंय शाळेत ( ७ वीचं) त्यामधे खूप काही माहिती हवी आहे, त्या साठी नेट आवश्यक असतेच. हे इतके तकलादू कारण आहे की यावर काय बोलावे हे समजत नाही. घरी एनसायक्लोपेडीयाची सिडी घेउन दिली, किंवा हार्ड कॉपी आणून दिली मुलांना तरीही काम होऊ शकतं, नेट वर जायची गरज नाही!
२)दुसरे कारण, की मुलाला आयटी द्यायचंय, तेंव्हा आतापासूनच कॉम्प्युटरची सवय असलेली बरी.
३) अरे आम्हाला काही फारसं येत नाही कॉंप्युटरचं, पण आता पासून हातात दिलं, तर त्याची भीड चेपेल. अशी अनंत कारणे देता येतात. मी स्वतः मुलींना १२वी होई पर्यंत नेट वर जाऊ दिले नव्हते, आणि तिचे काहीही अडले नाही.नेट न वापरल्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत ती कमी पडली नाही कधीच. इथे फक्त तीनच कारणं देतोय पण अशी अनंत कारणॆ लोकं सांगतात.
मित्राशी गप्पा मारतांना तो म्हणाला की त्याच्या घरी इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी ऑन केलेली आहे, त्यामुळे मुलाला इतर ( म्हणजे सेक्स रिलेटेड) काही पहाता येणार नाही. इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी लेव्हल सेट करता येते. मी त्याचं कॉंप्युटर चेक केलं, तर त्या मधे गुगल क्रोम पण दिसलं- त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने डाउन लोड केलेले दिसले. आयई तर तो मुलगा वापरत नव्हता.क्रोमची हिस्टरी चेक केली तर नको ते सगळं सापडलं- अगदी पोर्न ट्युब डॉट कॉम साईट पण नेहेमी व्हिजीट करायचा तो. आता या मधे त्या १४ वर्षाच्या मुलाला दोष द्यायचा की त्याच्या आईवडिलांना?
या वयात लागलेली इंटरनेटची सवय ही नंतर सुटणे अवघड जाते. मी पाहिले आहे, बरेच लोकं तर ट्विटींग वगैरे मधे इतके गुंतलेले असतात की जर कॉम्प्युटर वर नसतील तर ते सेल फोन वरुन पण ट्विट करतात. बरं ते असू द्या, इंटरनेट मुलांच्या रोगामधे कधी परावर्तीत झालाय हे पण पालकांच्या लक्षात येत नाही.
जसे मुलं रात्री टॉयलेटला जायला चार वाजता उठले तरीही नेट वर जाउन आधी इ मेल्स चेक करतात पुन्हा झोपण्या पुर्वी .सकाळी उठल्याबरोबर आधी नेट वर जाउन मित्रांना स्टेटस अपडॆट करतात. सेल फोन वर मेसेंजर असतो आणि चोविस तास नेट वर ऑन लाइन असतात. नेट बंद झाले तर सायबर कॅफेत जाउन वेळ घालवतात. बरेचदा ही इंटरनेटवर खूप जास्त वेळ घालवायची सवय आईच्या लक्षात येते पण मुलांना काही म्हंटले तर स्वतःच्या इंटरनेट खऱ्या वापराबद्दल लपवाछपवी करतात मुलं . आणि ही अशी टेंडन्सी दिसली की समजा मुलगा ऍडीक्ट झालाय नेटचा.
चायना मधे अठरा वर्षाखालील दहा टक्के मुलं इंटरनेट ऍडीक्ट झालेले आहेत. यावर उपाय म्हणजे इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले तरीही मुलांमधे काही सुधारणा नाही असेही वाचण्यात आलेले आहे.
इतकं घाबरायचं कारण नाही, पण जर टीनएजर मुलांचे तुम्ही पालक असाल, तर थोडं लक्ष अवश्य द्या मुलांच्या नेट च्या वापराकडे. फेसबुक वरचे वर वर हार्मलेस दिसणारे खेळ जसे फार्म व्हिले, पोकर वगैरे खूप ऍडीक्टीव्ह आहेत- फार्म व्हिले वर तर मुलं तास अन तास आपलं शेत सजवत बसतात. तेंव्हा सांभाळा!!!
No comments:
Post a Comment