1 आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) एड्रेस म्हणजे नक्की काय?
आपण १९८२ पासून जगभर ही अंक ओळख वापरतोय. आयपी एड्रेसची साधी सरळ सोपी व्याख्या म्हणजे - वर्ल्ड वाईड वेब (इंटरनेट) वर तुमच्या संगणकाची असलेली सांकेतिक ओळख अंकांच्या स्वरुपात. हे अंक तुमच्या संगणकाला जागतिक नेटवर्कशी (डिजीटल स्वरुपात) जोडण्यास आणि माहिती आदानप्रदान करण्यात उपयुक्त ठरतात.
2 आयपी एड्रेस व्हर्जन ४.० नक्की कसा असतो?
आपण सध्या जे आयपी एड्रेस व्हर्जन वापरतो ते आहेत IPv4. ह्या आयपी एड्रेसमध्ये चार क्रमांक असतात, जे प्रत्येकी तीन अंकी असतात. हा साधारणपणे XXX.XXX.XXX.XXX असा असतो (उदारणार्थ १७२.८.९.०). ह्यात "X" च्या जागी ० ते २५५ ह्या मधले कुठलेही अंक असू शकतात. ह्यामध्ये प्रत्येक तीन अंकी क्रमांक ८ बीट्सचे असतात. बीट्स हे एक मापक आहे संगणक गणिती प्रणालीचे, ज्यात प्रत्येक अंक त्या उपकरणात डीजीटली किती माहिती साठवलेली आहे त्याची जागा दर्शवितो. त्यानुसार आयपी व्हर्जन ४.० मध्ये ८+८+८+८=३२ बीट्स आहेत.
3 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची गरज ती काय?
वर दिलेल्या माहितीनुसार ३२ बीट्सचा असलेला आयपी एड्रेस व्हर्जन ४.० आपल्याला ४,२९४,९६७,२९६ इतके पब्लिक एड्रेस देऊ शकणार होता. आता इतक्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे साहजिकच जितके कॉम्बिनेशन्स आपण वापरू शकत होतो ते संपू लागलेत आणि तेव्हाच इंटरनेटच्या पुढच्या पिढीची म्हणजेच आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची सन १९९५ मध्ये निर्मीती करण्यात आली.
4 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कसा असतो आणि याचे फायदे काय?
इंटरनेटची पुढची पिढी व्हर्जन ६.० खुप संशोधनातून तयार केली गेली आहे. व्हर्जन ४.० च्या तुलनेत व्हर्जन ६.० मध्ये १२८ बीट्सची क्षमता आहे. हे तयार करताना मागील व्हर्जनमधल्या तीन अंक स्वरुपात बदल करून तो चार अंकी करण्यात आला आणि चार क्रमांक वाढवून ८ करण्यात आले. म्हणजेच चारपट जास्त आयपी एड्रेस आपल्याला मिळतील . हा साधारपणे XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX अश्या फॉर्ममध्ये दिसेल (उदाहरणार्थ - 3ffe:1900:4545:3:200:f8ff:fe21:67cf). ह्यामध्ये प्रत्येक चार अंकी क्रमांक हा १६ बिट्सचा असणार (अंक आणि अक्षर असल्याने) आहे. त्यामुळे १६+१६+१६+१६+१६+१६+१६+१६=१२८ बिट्स. आपणास फरक जाणवेल की जुन्या व्हर्जनमध्ये दोन अंकांच्यामध्ये डॉट (.) होता आणि इथे कोलन् ( : ) आहे. ह्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण केलेला बदल म्हणजे, ह्या आयपी एड्रेसमध्ये अक्षरसुद्धा असतील अंकांबरोबर A to F पर्यंत. ह्या प्रकारच्या आयपी एड्रेसमुळे जगभर नवीन ३४०,२८२, ३६६,९२०, ९३८,४६३,४६३,३७४,६०७,४३१,७६८,२२१,४५६ इतके युनिक आयपी एड्रेस जगभर उपलब्ध होतील.
5 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कधी पासून उपलब्ध होईल?
ह्या वर्ष अखेरीस जगभर व्हर्जन ६.० वापरायला सुरुवात होईल. अमेरिकेत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोन शहरात आमच्या कंपनीने व्हर्जन ६.० देण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती. सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता, पण मग सगळ सुरळीत झालं. आपल्या भारतातसुद्धा फेब्रुवारीपासून हे काम सुरु झालंय.
हे वापरण्यासाठी आपल्याला बदल करावे लागतील का?
हे व्हर्जन वापरण्यासाठी आपल्याला हार्डवेअरमध्ये काहीही बदल करावे लागणार नाहीत एक मोडेम रिसेट सोडून (काही ठिकाणी राऊटर रि-कॉन्फिगर करावे लागतील इतकंच). जर तुम्ही डायनामिक आयपी एड्रेस वापरत असाल तर तो आपोआप बदलला जाईल, आणि जर स्टॅटिक आयपी असेल तर आपल्याला मॅन्यूअली बदलावा लागेल.
ह्याचे फायदे ते काय?
१. खुप मोठ्या प्रमाणावर युनिक एड्रेस मिळणे.
२. नेटवर्क अजून जास्त सुरक्षित होईल.
३. डीएनएस (DNS - Domain Name System) जी संकेतस्थळ उघडण्यासाठी वापरली जाते ती प्रक्रिया थोडी जलद होईल.
काही तोटे -
१. हा आयपी लक्षात ठेवायाला कठीण आहे.
२. लगेच मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल काहीसा त्रासदायक ठरू शकतो इनस्टॉल करताना सर्वीस ऑपरेटर्सना चलो लेट्स होप फॉर द बेस्ट......
No comments:
Post a Comment