Thursday, 19 April 2012

सीडी राईट कशी करावी?


सीडी राईट कशी करावी, म्हणजेच आपल्या कॉम्पुटरमधिल माहिती सीडीवर कशी साठवावी.
तुमच्या कॉम्पुटरवर तुम्ही सीडीवरील गाणी, पिक्चर पाहू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये सीडी राईट देखिल करु शकता, सीडी राईट करण्यासाठी सीडी ड्राईव्हर हा सीडी राईटर असायला हवा. शक्ततो त्या सीडी ड्राईव्हरवर 'Recorder/Re-Writable/Writer' असे लिहिलेल असल्यास तुम्ही त्यावर सीडी राईट करु शकता.

विंडोज मध्ये सीडी राईट करण्यासाठी स्वतःचा सीडी राईटींचा प्रोग्राम आहे, परंतू त्यामध्ये काही आवश्यक गोष्टी नसल्यामूळे सीडी राईट करण्यासाठी 'Nero' हा स्वतंत्र प्रोग्राम जास्त प्रसिद्ध झाला. जास्तीत जास्त ठिकाणी 'Nero' हाच प्रोग्राम सीडी राईट करण्यासाठी वापरला जात असल्याने आपणदेखिल तोच प्रोग्राम कसा वापरायचा ते पहाणार आहोत.

टिप : 'Nero' या एकाच प्रोग्राममध्ये सीडी राईट केल्यास ती सीडी इतर ठिकाणी दुसर्‍या कॉम्पुटरवर देखिल 'Nero' या प्रोग्रामद्वारे पून्हा-पून्हा ती सीडी राईट करु शकता.

'Nero' प्रोग्रामद्वारे सीडी राईट केरण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
तुमच्या कॉम्पुटरमध्ये 'Nero' प्रोग्राम असल्यास रिकामी सीडी (Blank CD) कॉम्प्युटर मध्ये टाकताच एका छोट्या चौकोनात ती सीडी 'Nero' प्रोग्रामद्वारे राईट करायची आहे का? असा संदेश येईल, त्यावर क्लिक करताच 'Nero' प्रोग्राम आपोआप सुरु होईल.



१. आपणास जर कॉम्पुटरमधिल एखादी माहिती अथवा एखादी फाईल सीडीवर राईट करायची असेल तर त्या चौकोनातील वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Data' या विभागावर माऊस न्या आणि त्याच विभागातील 'Make Data CD' या उपविभागावर क्लिक करा.


 
२. आता पुढील चौकोनात वर उजव्या बाजूला 'Add' असे बटण दिसेल. सीडी मध्ये ज्या फाईल्स राईट करायच्या आहेत त्या निवडण्यासाठी इथे क्लिक करा.



३. 'Add' या बटणावर क्लिक करताच 'Select Files and Folders' असा एक छोटा चौकोन समोर येईल. त्यामध्ये आपणास हव्या असलेल्या फोल्डर मधून आपणास हव्या असलेल्या फाईल्स निवडाव्या व खालिल 'Add' व नंतर 'Finished' ह्या बटणावर क्लिक करावे.



४. आता मगाचचाच चौकोन आपल्या समोर येईल ज्यामध्ये आपण निवडलेल्या फाईल्स असतील, तसेच त्या सर्व फाईल्सना एकुण किती जागा लागली आहे हे देखिल त्याच चौकोनात दिलेले असेल. आता पूढे जाण्यासाठी 'Next >' ह्या बटणावर क्लिक करा.



५. आता या पुढिल चौकोनात
* तुम्हाला त्या सीडीला काय नाव 'Disc name' द्यायचे आहे?,
* ती किती स्पिडला 'Writing Speed' राईट करायची आहे? (शक्यतो हा स्पिड '16x (2,400KB/s)' द्यावा, जेणे करुन ती सीडी सर्व कॉम्प्युटर्सवर चालेल.),
* तसेच 'Allow files to be added later (multisession disc)' म्हणजेच ती सीडी पून्हा-पून्हा राईट करुन वापरायची असल्यास त्या पुढील चौकोनावर क्लिक करावे.
या सर्व गोष्टी दिल्यानंतर खालिल ' Burn ' ह्या बटणावर क्लिक करावे.



६. आता आपल्यासमोर सीडी राईट करण्याची प्रक्रिया सुरु होईल.



७. सीडी पूर्ण राईट होताच आपल्यासमोर ' Burn process completed successfully at 16x (2,400 KB/s) ' असा संदेश येईल, तीथे ' OK ' वर क्लिक करा. बस्स असे करताच आपली सीडी राईट होवून आपोआप बाहेर येईल.

८. आता इथे पुन्हा एकदा तोच चौकोन येईल त्यावरील ' Next ' ह्या बटणावर क्लिक करा.



९. आता या शेवटच्या चौकोनामध्ये कॉम्पुटर आपणास ' Exit ' असे विचारेल त्यावर क्लिक करा आणि तो प्रोग्राम बंद करा.


No comments:

Post a Comment