१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता.
२. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा.
३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता.
४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता.
५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता.
६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे.
७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल
८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो.
९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते.
१०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे.
११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे.
१२. www.bugmenot.com - बर्याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते.
१३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.
No comments:
Post a Comment