किती तरी वेळा आपण कंप्युटर खराब झाल्याने आपला किमती वेळ आणि डाटा वाया जातो. कंप्युटरच्या खराबिला चांगले करण्यासाठी कधी कधी फोर्मेट शिवाय पर्याय नसतो. पण आता एक मोफत पोर्टेबल टूल जो कंप्युटर ठीक करण्यासाठी मदत करेल.
यामध्ये तुम्ही ५ सोप्या टप्प्यात तुमचा कंप्युटर ठीक करू शकाल.
पहिल्या टप्प्यात तुम्ही व्हायरसने निर्माण झालेली खराबी ठीक करू शकाल पण जर तुम्ही अगोदरच चांगला एन्टीव्हायरस वापरत असाल तर तुम्ही सरळ दुसरा टप्पा सुरु करू शकता.
दुसऱ्या टप्प्यात डिस्क चेक, तिसरयात सिस्टीम फाईल चेक, चौथा सिस्टीम रेस्टोर पोइन्ट.
लक्षात ठेवा या टूलचा वापर करताना विंडोज एक्सपी तुम्ही वापरत असाल तर विंडोज एक्सपीच्या सीडी तयार ठेवा कारण याची गरज भासू शकते.
कंप्युटर फोर्मेट करण्या अगोदर शेवटचा पर्याय म्हणून या टूलचा वापर करून पहा. हा पोर्टेबल टूल असल्याने सेफमोड मध्ये विना इंस्टाल करताही तुम्ही वापरू शकता.
No comments:
Post a Comment