प्रत्येक सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी आपल्या सॉफ्टवेअरची जाहिरात त्यांच्या संकेतस्थळावर करीत असतात. त्याच सोबत इंटरनेटवर इतर काही संकेतस्थळावर आपल्या सॉफ्टवेअरची माहिती देवून आपल्या सॉफ्टवेअरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो
.
.
इंटरनेटवर अशीच काही संकेतस्थळे आहेत ज्यावर नवनविन निर्माण होणार्या सॉफ्टवेअरची माहिती दिली जाते. अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे
.
.
१. | डाऊनलोड.कॉम | : | www.download.com |
२. | फाईलहिप्पो.कॉम | : | www.filehippo.com |
३. | ब्रदरसॉफ्ट.कॉम | : | www.brothersoft.com |
४. | सॉफ्टअहेड.कॉम | : | www.softahead.com |
५. | सॉफ्टपेडिया.कॉम | : | www.softpedia.com |
वरील संकेतस्थळे चांगल्या दर्जाची असून दररोज या संकेतस्थळांवरुन लाखोंच्या प्रमाणात निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना डाऊनलोड केले जाते.
एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना त्या सॉफ्टवेअरबद्दलच्या खाली दिलेल्या गोष्टी निट तपासून पहाव्यात.
१. | सॉफ्टवेअर मोफत (Free) आहे का? काही काळासाठी (Trial Version) आहे का? विकत (Paid) आहे का? त्यातील फक्त काही मर्यादीत (Shareware) गोष्टी चालतात का? |
२. | सॉफ्टवेअर कधी बनविलेले आहे. कारण नजिकच्या काळामध्ये बनविलेले सॉफ्टवेअर नक्किच चांगले, सर्व ऑपरेटींग सिस्टमला सहाय्य करणारे आणि विविध चांगल्या गोष्टी समाविष्ट असलेले असते. |
३. | सॉफ्टवेअर विंडोजच्या सर्व व्हर्जनवर चालणारे आहे का? म्हणजेच Windows XP, Vista, 7 वर चालेल का? कारण एखाद्या वेळेस आपण तेच सॉफ्टवेअर निराळ्या ऑपरेटींग सिस्टमवर टाकल्यास तेथे ते चांगल्याप्रकारे चालावे. |
४. | सॉफ्टवेअर बद्दलच्या इतरांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात. जेणेकरुन ते सॉफ्टवेअर वापरल्यानंतर आपणास कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये. इतरांच्या प्रतिक्रिया बर्याच वेळेस आपल्या उपयोगाच्या असू शकतात. |
टीप : कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी ते सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
No comments:
Post a Comment