Thursday, 3 May 2012

सोशल नेटवर्किंग म्हणजे काय?


आपण फेसबुक, ऑर्कुट आणि ट्विटर ही नावे ऐकली असतील आणि त्याच सोबत या सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहेत हे देखिल आपण ऐकले असेलच.
या वेबसाइट मोफत सेवा देणार्‍या वेबसाइट आहेत. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा आणि प्रत्येकाला इंटरनेटवर आपली स्वतंत्र ओळख करुन देणार्‍या या वेबसाइट आहेत. या वेबसाइटवर आपण आपले मोफत खाते उघडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे खाते उघडण्यासाठी आपल्याला ठराविक एखाद्या म्हणजे जी-मेल अथवा याहूचाच ई-मेल असणे आवश्यक नाही. आपण आपल्या कोणत्याही ई-मेलच्या सहय्याने या वेबसाईटवर आपले खाते उघडू शकता.
जुने मित्र-मैत्रिणी शोधणे, तसेच नविन ओळखी वाढविणे, व्यक्तीनुसार त्यांचा समुह ( communities ) तयार करणे, ग्रिटींग पाठविणे, वाढदिवस लक्षात ठेवणे, आवडीनुसार त्यांना बातम्या/माहिती देणे, नविन असलेल्या गोष्टींची मोबाईलवर माहिती सांगणे, नोकरी शोधण्यासाठी मदत करणे इ.इ. सेवा या वेबसाइट पुरवितात.

सोशल नेटवर्किंग म्हणजे अशा वेबसाइट ज्यांचा मुख्य उद्देश आपले नाव प्रसिद्ध करण्याचा नसून आपल्या सभासदांना त्यांना हवे ते करण्याची मुभा देणे हा असतो.

सध्याच्या युगामध्ये आपल्या प्रत्येक ओळखीच्या माणसाबरोबर संपर्कात राहणे शक्य नाही अशा परीस्थितीत या जगातून कुठूनही सर्वांशी संपर्कात राहून सर्व गोष्टी लक्षात ठेवून चालू घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंग वेबसाइट फार उपयोगी आहेत. कारण इथे प्रत्येकाला भरपुर वेळ न देता फक्त ' कसे आहात ? ' हा प्रश्न देखिल पुरेसा असतो. जेणेकरुन आम्हाला तुम्ही लक्षात आहात हे दुसर्‍याला सांगता येते. तसेच वेळ असेल तेव्हा ऑनलाईन असलेल्या व्यक्तीशी थेट चॅटींगची देखिल सोय या सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर असल्याने कुणाची आठवण आल्यास अथवा कुणाला काहिही सांगायचे असल्यास तो जरी ऑनलाईन नसला तरी त्याच्यासाठी निरोप ठेवण्याची सोय इथे असते, मग जेव्हा ती व्यक्ती आपले खाते उघडून पाहिले तेव्हा तीला आपला निरोप न चुकता मिळतोच. त्याचसोबत महत्वाच्या घटना लक्षात ठेवणे. जसे एखाद्याचा वाढदिवस, एखादा कार्यक्रम इ. या गोष्टी देखिल वेळोवेळी आठवण करुन दिल्या जातात. जेणे करुन काहिही विसरण्याचा प्रश्नच येत नाही.

काही सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर आपल्या मित्रांसोबत ऑनलाईन गेम्स खेळण्याची देखिल सोय असते. या व अशा कितीतरी गोष्टी सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर उपलब्ध असल्याने सोशल नेटवर्किंगच्या मोहातून बाहेर पडणे कठीण होते.

No comments:

Post a Comment