गुगल ही कंपनी एक अद्भुत कंपनी आहे. फक्त एका सर्चइंजीन वरून मल्टी बिलीयन डॉलर कंपनी होणे व आत्ताच्या घडीला इंटरनेट वर अधिराज्य गाजवणारी सेवा कंपनी होणे तेही मायक्रोसॉफ्ट आणि याहु सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून हे खरच अद्भुत आहे. सर्जी ब्रिनच्या एका व्हाईट पेपर प्रमाणे 'इंटरनेट तुमच्या खिशात' असे स्वप्न असलेली गुगल ही सेवा कंपनी अत्तुच्य अभियांतत्रिकी सेवा देऊन आपले सर्व दैनंदिन जीवन व्यापणार अशी लक्षणे दिसत आहेत.
अनेकोत्तम सेवा देण्यार्या ह्या कंपनीची एक नवी सेवा कालपासून सुरू झाली, गुगल ड्राइव्ह.
५GB इतकी जागा फुकट देऊन ही सेवा गुगलने सर्वांसाठी सुरु केली आहे. पण गुगलच्या उत्कंठा वाढवणार्या कॅम्पेननुसार तुमच्या अकाऊंटवर ही सेवा उपलब्ध होण्यास काही वेळ लागू शकतो. मी ट्राय केल्यावर मला 'Your Google Drive is not ready yet' असा निरोप येतोय
असो, काय आहे विषेश ह्या सेवेत? तसे वेब वर जागा असणे ही सेवा काही नाविण्यपूर्ण किंवा युनिक नाहीयेय. बरेच सेवा पुरवठादार आधिपासूनच ही सेवा देत आहेत. मग गुगलचे काय एवढे विषेश? तर ह्या सेवेचे गुगलच्या इतर सेवांबरोबर होणारे एकसंगीकरण हे विषेश असणार आहे.
गुगल डॉक्स ही सेवा जर वापरत असाल तर खुषखबर ही आहे की गुगल डॉक्स हे गुगल ड्राईव्ह प्लॅटफॉर्मवरच तयार केले आहे. त्यामुळे आता गुगल डॉक्सवर तयार केलेली डॉक्युमेन्ट्स गुगल ड्राईव्हवर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ह्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर करू शकाल. तसेच एकच फाइल अनेकजण एकाच वेळी एडीट करू शकाल. एकाचवेळी अनेकांना एकच डॉक्युमेंट एडीट करता येउ शकणे हा एक खरंच उच्च अभियांत्रिकी (पेटंटेड) शोध आहे गुगलचा.
ही सेवा विंडोज, मॅक, iOS, अॅन्ड्रॉइड ह्या सर्व प्लॅट्फॉर्म्स वर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कुठुनही आणि कधीही तुम्ही तुमच्या फाइल्स हाताळू शकता.
गुगलचे ब्रेड आणि बटर असलेली 'गुगल सर्च' ही सेवा तुमच्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी तुमच्या दिमतीला हजर असेल. स्कॅन केलेल्या फाइल्स/डॉक्युमेंट्स मधूनही 'OCR' हे तंत्रज्ञान वापरून टेक्स्ट सर्च करून तुमच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधल्या जाणार आहेत.
Google Drive
drive.google.com हा दुवा वापरून तुम्ही तुमचे गुगल ड्राइव्ह सुरु करु शकता.धन्यवाद
निशीकांत मानुगडे सोबत
No comments:
Post a Comment