आजचा संगणक थोड्या दिवसांत आणि एकाच व्यक्तीकडून तयार झालेला नाही. अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या कालखंडात लावलेल्या शोधाचा तो परिपाक आहे. मानवाला रोजच्या व्यवहारात वेगवेगळ्या कारणांसाठी आकडेमोड करावी लागते. ही आकडेमोड वेगाने व अचूक होण्यासाठी मानवाने सातत्याने प्रयत्न केले. त्यातून वेगवेगळी गणन यंत्रे शोधली गेली. त्यात बदल होत होत सुधारणा करून सध्याचा संगणक तयार झाला.
सर्व साधारणपणे 5000 वर्षांपूर्वी इजिप्त, चीन, जपान या देशांमध्ये ऍबॅकस हे उपकरण आकडेमोडीसाठी वापरात येत आहे. अंकगणितासाठी वापरले गेलेले हे पहिले उपकरण होय. त्यामुळेच ऍबॅकस हा संगणकाचा पूर्वज म्हणावयास हवा. शाळेत मुलांना शिकविण्यासाठी मण्यांची पेटी वापरतात. तशा स्वरूपाचे हे पहिले यंत्र होय. तारेत ओवलेले मणी मागे पुढे सरकवून त्याकाळी बेरजा- वजाबाक्या केल्या जात असत.
(2) कंपासचा शोध (1597) ः गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने अनेक शोध लावले. ऍबॅकसपेक्षा जास्त वेगाने गुणाकार, भागाकार आणि त्याच प्रकारची आकडेमोड कंपासच्या शोधाने शक्य झाले. त्यामुळे कंपास सर्व जगभर वापरात आले.
(3) लॉग टेबलचा शोध (1614) ः जान नेपियर या शास्त्रज्ञाने पहिले लॉग टेबल प्रसिद्ध केले. लॉगटेबलच्या साह्याने गुणाकार, भागाकार या क्रिया बेरीज व वजाबाकी याद्वारे करता येऊ लागल्या. त्यामुळे लॉगटेबल सर्व जगभर वापरले जाऊ लागले.
(4) स्लाईडरुलचा शोध (1620) ः विल्यम आऊट्रेड या शास्त्रज्ञाने लांब पट्टीसारख्या स्लाईडरुलचा शोध लावला. वापरास सुटसुटीत असल्याने त्याचा वापर जगभर सुरू झाला.
(5) गणिती यंत्राचा शोध (1642 ते 1647) ः ब्लेझ पास्कल या फ्रेंच शास्त्रज्ञाने यंत्र बनविले. या यंत्रात दातेरी चाकावर तबकड्यांचा वापर करून बेरजा व वजाबाक्या अतिशय वेगाने आणि अचूकपणे करता येतात. यास यांत्रिक कॅल्क्युलेटर असे संबोधले.
(6) रेकनरचा शोध (1694) ः ग्रॉटफ्रीड लाइबनित्झ या गणित तज्ज्ञाने पास्कलाईन यंत्रामध्ये खूप सुधारणा केल्या आणि नवीन यंत्र बनवले. हे यंत्र गुणाकार व भागाकार वेगाने करू शकत होते
.
(7) डिफरन्स इंजिनचा शोध (1821) : 19 व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना चार्ल्स बॅबेज याने हे यंत्र तयार केले. दरवर्षी नवनवीन यंत्रे होत होती. गणिते सोडविण्यासाठी आणखी नवीन वेगवान यंत्राची गरज भासू लागली. त्या वेळी एका अतिशय प्रज्ञावंत शास्त्रज्ञाने संगणकाची अतिशय तर्कशुद्ध कल्पना मांडली. या यंत्रामध्ये आकडे देण्यासाठीचा विभाग, आकडेमोड करण्याचा विभाग, आकडे साठवता येणारा विभाग असे अनेक विभाग होते. त्यामुळेच चार्ल्स बॅबेजला आजच्या संगणकाचा आद्य जनक मानले जाते.
बॅबेजनंतरही अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून निरनिराळी यंत्रे तयार केली. जोसेफ ऍकार्ड या संशोधकाने हातमागाच्या यंत्रामध्ये छिद्रांकित कार्डाचा वापर केला. या कार्डाच्या वापरामुळे कामाचा वेग व अचूकता वाढली.
संगणकाच्या वेगवेगळ्या पिढ्या :
इलेक्ट्रॉनिक्स या विषयात जसजशा सुधारणा होत गेल्या तसतसे संगणकाच्या रचनेतही बदल होत गेले. बदल केलेले संगणक ज्या कालावधीत वापरात आले त्या कालावधीचा उल्लेख संगणकाची पिढी असा केला जातो.
(1) पहिला पिढी (1942 ते 1948) : या पहिल्या पिढीतील संगणक आकाराने खूप मोठे होते. जवळ जवळ एक खोलीची जागा त्यांना लागत होती. यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हॅक्यूम ट्यूबचा म्हणजेच निर्वात नळ्यांचा वापर केला जाई. यात 15,000 जागा अथवा अक्षरे मावतील अशी मर्यादा होती. या संगणकाचा वेग खूप कमी होता. संगणकात बिघाड खूप होत असत.
(2) दुसरी पिढी (1948 ते 1964) ः यामध्ये ट्रान्झिस्टर या घटकाचा वापर करण्यात आला. त्यामुळे खोलीएवढ्या आकाराचे संगणक कपाटाएवढे झाले. संगणकाचे उत्पादन शक्य झाले. त्याचा वेग माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढल्याने कारखान्यामध्ये आणि उद्योगात वापर वाढला.
(3) तिसरी पिढी (1964 ते 1974) ः यामध्ये सुट्या ट्रान्झिस्टरऐवजी ट्रान्झिस्टर व त्यांना जोडणारे घटक एकत्र बसविलेल्या चिप्स वापरण्यात आल्या. यालाच इंटिग्रेटेड सर्किट्स असे म्हणतात. आय.सी. मुळे दुसऱ्या पिढीच्या तुलनेत संगणकाचा वेग वाढून माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढली. संगणक ठेवण्याची जागा कमी झाली. विद्युतशक्ती कमी लागू लागली. बिघाड होण्याचे प्रमाण कमी झाले. किमती कमी झाल्या. संगणक वापरास सोपे व सोईचे बनले.
(4) चौथी पिढी व इंटरनेटचा वापर (1974 पासून पुढे) ः या संगणकात व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड चिप्सचा वापर करण्यात आला. यालाच मायक्रो प्रोसेसर असे म्हणतात. त्यामुळे संगणकाची क्षमता वाढली आणि वेगही वाढला. संगणकाचा आकार लहान झाला. किंमत कमी झाली. याच पिढीपासून इंटरनेटचा वापर सुरू झाला. सध्या वापरात असलेले पेंटियम संगणक याच पिढीतील आहेत. पी-वन, पी-टू, पी-थ्री, पी-फोर अशा नवनवीन प्रणालीत सुधारणा घडवत त्याचे प्रकार सुरू झाले.
(5) पाचवी पिढी : माहितीवर आधारलेली पद्धती व कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टींच्या आधारे संगणक प्रणालीची पाचवी पिढी आता आकार घेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक आपण लिहिलेले वाचू शकतात.
संगणकाचे प्रकार :
(1) मायक्रो कॉम्प्युटर : यालाच पर्सनल कॉम्प्युटर असेही म्हणतात. या संगणकात मायक्रोप्रोसेसरची एक चीप असते. माहिती साठविण्याची क्षमता कमी असते. वेगही कमी असतो. एकावेळी एकचजण या प्रकारचा कॉम्प्युटर वापरू शकतो. त्यामुळेच खासगी कामासाठी त्याचा वापर करतात. शाळेत, घरात हेच संगणक वापरले जातात.
(2) मिनी कॉम्प्युटर : एकापेक्षा जास्त जण एकाचवेळी काम करू शकतात. रेल्वे आरक्षण, बॅंकिंग, संशोधन क्षेत्रात वापरतात.
(3) मेनफ्रेम कॉम्प्युटर : डेटा साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असते. माहितीवर प्रक्रिया करण्याचा वेग अधिक असतो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये हा संगणक सर्व्हर म्हणून वापरला जातो. या प्रकारच्या संगणकाला कमी तापमान व धूळ विरहित खोलीची आवश्यकता असते
.
(4) सुपर कॉम्प्युटर : अति उच्च गतीने गाणितीय क्रिया करू शकणाऱ्या संगणकांना महासंगणक म्हणतात. यात अनेक प्रोसेसर्स असतात व त्यांची माहिती साठविण्याची क्षमताही प्रचंड असते. 1960 च्या दशकामध्ये सेमाडर क्रे यांनी कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये महासंगणक निर्माण केला. आज आय.बी.एम. एच.पी. या सारख्या संगणकाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये तो तयार केला जातो. भारतामध्ये "सीडॅक' संस्थेने परम संगणक विकसित केला. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मॉडेल विकसित करण्यात आले. संरक्षण संशोधन संस्थांमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे.
(5) पोर्टेबल संगणक : हा आकाराने लहान असलेला संगणक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. हा छोट्या बॅगमध्ये किंवा ब्रिफकेसमध्ये बसतो. हा संगणक बॅटरीवर चालू शकतो. प्रवासात संगणकावर काम करावयाचे झाल्यास या संगणकाचा उपयोग चांगला होतो. लॅपटॉप व पामटॉप ही पोर्टेबल संगणकाची उत्तम उदाहरणे आहेत.
मल्टिमीडियातील क्रांती :
मल्टिमीडिया म्हणजेच विविध माध्यमे. चित्र, आवाज, लेखन अशा माध्यमांचे एकत्रीकरण नवनवीन शोध लागल्यामुळे संगणकाचा उपयोग केवळ लेखन माहिती साठवून ठेवणे, आकडेमोड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता या सर्वच गोष्टी एकत्रित करून त्या समाविष्ट करणे आता सोपे झाले आहे. संगणकावर काम करताना आपण गाणी ऐकू शकतो. छायाचित्रे टाकू शकतो. चित्रपट पाहू शकतो. कार्टून काढू शकतो. गाण्यांचा संग्रह करू शकतो. या सर्व करामतीला मल्टिमीडिया असे आपण संबोधतो.
मल्टिमीडियाचे फायदे :
(1) संगणकावर मनोरंजनाचे खळे खेळता येतात. मनोरंजनामधून अध्ययन आणि अध्यापन करता येते.
(2) चित्रांचा, भाषांचा, गाण्यांचा संग्रह करता येतो.
(3) स्वत:चा आवाज ध्वनिमुद्रित करून ऐकता येतो.
(4) चित्रपट पाहता येतात.
मल्टिमीडियासाठी आवश्यक साधने :
(1) सी.डी. रॅम ड्राईव्ह : सी.डी. वापरण्यासाठी सी.पी.यू.मध्ये सीडी ड्राईव्ह बसवलेला असतो. सी.डी. ही गोल तबकडीसारखी असते. महत्त्वाची माहिती, विविध सॉफ्टवेअर्स साठवून ठेवण्यासाठी सी.डी.चा उपयोग करतात. काही सी.डीं.वरील माहिती वाचता येते. त्यात बदल करता येत नाही. म्हणून त्यास सी.डी. रॅम म्हणतात. एका सी.डी.ची क्षमता 700 ते 800 एम.बी. असते. हे एक महत्त्वाचे स्टोअरेज डिव्हाईस आहे.
(2) साऊंड कार्ड : संगणकावर गाणी ऐकायची असतील किंवा आपल्या आवाजातील गाणी, कविता साठवावयाच्या असतील तर हे कार्ड संगणकात बसावे. मदरबोर्डवर हे कार्ड बसवलेले असते.
(3) टी.व्ही. ट्यूनर कार्ड : हे कार्ड संगणकाच्या मदर बोर्डवर बसवलेले असते. या कार्डामुळे टी.व्ही.चे कार्यक्रम संगणकावर पाहता येतात. संगणकावर केलेले काम टी.व्ही.वर पाहू शकतो. आवडीचे कार्यक्रम कॉपी करता येतात.
(4) जॉयस्टिक : दांड्याची हालचाल करून कर्सर हलवता येतो.
(5) स्पीकर्स : ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी उपयुक्त.
(6) मायक्रोफोन : ध्वनिमुद्रण करण्यासाठी मायक्रोफोनचा उपयोग होतो.
(7) डिजिटल कॅमेरा : काढलेले फोटो आपण संगणकात साठवू शकतो.
(8) वेब कॅमेरा : मॉनिटरवर वेब कॅमेरा बसवून फोटो काढता येतात व संगणकात साठवता येतात. विवाह नोंदणी कार्यालयात त्याचा वापर होतो.
(9) हेडफोन : स्पीकर्स व मायक्रोफोन या दोन्ही सुविधा असतात.
(10) स्कॅनर : कोणतेही चित्र, फोटो, लिखाणाचा कागद जसाच्या तसा संगणकाच्या मेमरीत साठवता येतो. तो संगणकाला माहिती देण्याचे काम करतो. हे एक इनपुट डिव्हाईस आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा इतिहास ः
(1) ऍबॅकसचा शोध ः प्राचीन काळात मानव वस्तू मोजण्यासाठी हाताच्या बोटांचा किंवा लहान दगडाच्या खड्यांचा वापर करीत होता. त्यातूनच पुढे दशमात पद्धत आणि अंकगणिताचा जन्म झाला.सर्व साधारणपणे 5000 वर्षांपूर्वी इजिप्त, चीन, जपान या देशांमध्ये ऍबॅकस हे उपकरण आकडेमोडीसाठी वापरात येत आहे. अंकगणितासाठी वापरले गेलेले हे पहिले उपकरण होय. त्यामुळेच ऍबॅकस हा संगणकाचा पूर्वज म्हणावयास हवा. शाळेत मुलांना शिकविण्यासाठी मण्यांची पेटी वापरतात. तशा स्वरूपाचे हे पहिले यंत्र होय. तारेत ओवलेले मणी मागे पुढे सरकवून त्याकाळी बेरजा- वजाबाक्या केल्या जात असत.

No comments:
Post a Comment