मायक्रोसॉफ्टने नुकतीच आपली नवी ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. या पाठोपाठ लगेजच मायक्रोसॉफ्ट लगेजच क्लाऊड कम्प्युटिंगवर आधारित आपले नवे 'ऑफिस 365' लॉन्च करत आहे. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अफिस सोल्युशनमध्ये एकाधिकार शाही असलेली मायक्रोसॉफ्टने आत्तापर्यंत ऑफिसचे अनेक व्हर्जन्स बाजारात आणले आहे. यामध्ये ऑफिस 2007नंतर मायक्रोसॉफ्टने ऑपरेटिंग सिस्टिमवर लक्ष केंदित करत ऑफिस सोल्युशनकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र भविष्यातील तंत्रज्ञानाचा आढावा घेत मायक्रोसॉफ्टने तब्बल तीन वर्षांनी ऑफिस सोल्युशन बाजारात आणले आहे.
' ऑफिस 365' यामध्ये ऑफिसचे वेब अॅप्लिकेशन वापरता येणार आहे. हे लाइटवेट ऑनलाइन व्हर्जन असणार आहे. यामध्ये आपण र्वल्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट याबरोबरच ऑनलाइन कम्युनिकेशनही करू शकतो. यासाठी मायक्रोसॉफ्टने या व्हर्जनमध्ये शेअर पॉइंट नावाची सुविधा दिली आहे. ही व्हर्जन क्लाऊड कम्प्युटिंगवर आधारित असल्याने यामध्ये आपण अनेक ऑनलाइन पॅकेजेस वापरू शकतो. यासाठी या व्हर्जनसोबत विविध मासिक योजनाही जाहीर होणार आहेत. लहान उद्योजकांसाठी ऑफिसचे विशेष वेब अॅप्लिेकशन तयार करण्यात आले आहे. हे अॅप्लिकेशन त्यांना ऑनलाइन उपलब्ध होऊ शकणार आहेत. याचबरोबर यामध्ये ई-मेल, वॉइसमेल, एन्टरप्राइजेस सोशल नेटवकिर्ंग, इन्स्टण्ट मेसेंजिंग, वेब पोर्टल्स, एक्स्ट्रानेटस, वॉइस आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही वापरता येऊ शकणार आहे. या व्हर्जनमध्ये जर निर्धारित किंमतीपेक्षा थोडे अधिक पैसे मोजले तर, हे व्हर्जन मोठ्या उद्योजकांनाही आकषिर्त करू शकणार आहे. यासाठी ऑफिस 'प्रोफेशनल प्लस'ची सोयही देण्यात आली आहे.
हे ऑफिस क्लाऊडवर आधारीत असल्यामुळे, यातील फाइल्स स्टोअर करण्यासाठी आपल्याला आपल्या हार्डडिस्कमधील जागा खर्च करावी लागणार नाही. यासाठी मायक्रोसॉफ्टचे ऑनलाइन 'डेटा अॅक्सेसेबल सेंटर' उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे व्हर्जन विशेषत: छोट्या उद्योजकांना समोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे, माक्रोसॉफ्टचे सीईओ स्टिव बोलमर यांनी स्पष्ट केले आहे. हे व्हर्जन र्व्हच्यअल असल्यामुळे याचा वापर आपण कम्प्युटरबरोबरच लॅपटॉप आणि मोबाइलमध्येही करू शकणार आहे. यामुळे छोट्या उद्योजकांना स्टोअरेजसाठी विशेष खर्च करावा लागणार नाही. भविष्यात सर्वत्र क्लाऊड कम्प्युटिंगचा वापर होणार आहे. यामुळे कंपन्यांचा खर्चात कमालीची कमी होणार आहे. विविध देशांमध्ये क्लाऊडचे सोल्युशन घेऊन अनेक कंपन्यांनी आपले तळ ठोकण्यास सुरूवात केली आहे. म्हणजे या कंपन्या मायक्रोसॉफ्टकडून एकदाच सर्व पैसे देऊन अधिकृत सॉफ्टवेअर्स विकत घेणार आणि त्यावर पैसे कमविणार यामुळे लंबी 'रेस का घोडा' असलेल्या मायक्रोसॉफ्टने मात्र या नव्या व्हर्जनच्या माध्यमातून क्लाऊड माकेर्टमध्ये उडी घेत प्रतिस्पधीर् कंपन्यांना चांगलाच चपराक बसविला आहे.
No comments:
Post a Comment