संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने आपण अशा अनेक चांगल्या चांगल्या वेबसाईट्सना भेट देऊ शकतो, ज्या आपलं मनोरंजन करण्याबरोबरच आपल्या ज्ञानातही भर टाकतात. पण अनेकदा अशा वेबसाईट्स इंग्रजी भाषेत असतात आणि मग कितीही म्हटलं तरी आपल्या मातृभाषेची सर अशा इंग्रजी वेबसाईटला येऊ शकत नाही. जेंव्हा आपण आपल्या माय मराठी भाषेत असलेली वेबसाईट पाहतो, तेंव्हा नक्कीच ती आपल्याला अधिक जवळजी वाटते!
इंटरनेटवर सध्या मराठी वेबसाईट्सचे प्रमाण इंग्रजीच्या मानाने खूपच कमी आहे आणि अशाच काही मोजक्या निवडक चांगल्या मराठी वेबसाईट्समध्ये समावेश होतो तो ‘महाराष्ट्र माझा’ या वेबसाईटचा! maharashtramajha.com अशा एका सरळ सोप्या डोमेन नेम पत्त्यावर ‘महाराष्ट्र माझा’ ही वेबसाईट चालवली जाते. काय काय आहे या वेबसाईटवर!? त्यासाठी जरा या वेबसाईटच्या मेनूबारवरच एक नजर फिरवूयात! ब्लॉगर्स पार्क, सेलेब्रिटी, संस्कृती, राजकारण, Tech, पाककृती, मनोरंजन, आरोग्य, महाराष्ट्र, करिअर, कविता अशा अगदी चौफेर विषयांना ‘महाराष्ट्र माझा’ ही वेबसाईट स्पर्श करते.
मराठी वेबसाईट - महाराष्ट्र माझा |
‘महाराष्ट्र माझा’ वर Tech या विभागाची इंटरनेट, कंम्प्युटर आणि मोबाईल अशा तीन विभागात व्यवस्थित विभागणी करण्यात आली आहे. ‘आपल्या मृत्यू नंतर ईमेल्सचे काय?’, ‘गुगलचे नवे ऑनलाईन न्यूज रिडर’, ‘ट्विटर म्हणजे काय?’, ‘आपला पासवर्ड सुरक्षीत कसा ठेवाल?’ इ. अनेक मनोरंजक, पण त्यासोबतच रोमांचक विषय साध्या सोप्या मराठी भाषेत उलगडण्यात आले आहेत. फक्त Tech या विषयाबाबतच नाही, तर इतर विषयांवरही अनेक लेख या वेबसाईटवर आहेत, ज्यातून आपल्या ज्ञानात भर पडणार आहे! जसं ‘उपवासातून आरोग्य’, ‘तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?’, ‘दिपावली’, ‘सर्वधर्म ‘सण’भाव’, ‘सुविचार’, ‘मोहमाया झाली वेडी’, शिक्षक दिना निमित्त’ इ. इ. ...आणि म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की, आपला ई-मेल पत्ता देऊन ‘महाराष्ट्र माझा’ चे आर्टिकल्स जरुर सब्स्क्राईब करा!
‘महाराष्ट्र माझा’ चे मालक ‘आशिष कुलकर्णी’ यांची १७ जानेवरी २०१० रोजी ई-सकाळ साठी घेण्यात आलेली छोटिशी मुलाखत खाली देत आहे. ते आपल्या ब्लॉगमागची, वेबसाईटमागची भुमिका थोडक्यात सांगताना दिसून येतील. व्हिडिओत दाखवण्यात येत असलेले प्रसंग ‘मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या’ निमित्ताने चित्रित केले गेले आहेत.
R
No comments:
Post a Comment