गुगल सर्चचा आपण नेहमीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे उपयोग करु शकतो. त्यासाठी काही शॉर्टकट्स आहेत, त्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल.
उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, समजा तुम्हाला पुणे शहराचं हवामान पाहायचं असेल, तर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाईप करु शकता weather pune आणि लगेच तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे पुण्याचं हवामान दिसून येइल.
 |
हवामान |
आता समजा तुम्हाला एखाद्या शहराची वेळ पहायची असेल, तर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाईप करु शकता, time (आणि शहराचं नाव) उदा. time pune. आता खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पुण्याची वेळ दिसून येईल.
 |
वेळ |
आणि आता एखाद्या शहराचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही टाईप करु शकता (शहराचं नाव) map. उदा. सर्च बॉक्स मध्ये pune map टाईप करुन पहा.
 |
नकाशा |
एखाद्या खेळाचा स्कोअर जाणून घ्यायचा असेल तर... उदा. score cricket
 |
स्कोअर |
एखाद्या शहराची लोकसंख्या जाणून घ्यायची असेल तर!? उदा . असं टाईप करा population mumbai
 |
लोकसंख्या |
एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या जाणून घ्यायची असेल तर काय कराल!? सर्च बॉक्स मध्ये define: (शब्द) असं टाईप करा. उदा. define: movie. खाली देलेले चित्र मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 |
movie चा अर्थ, व्याख्या |
गुगल सर्च इंजन च्या बाबतीत आपण अशा भरपूर शॉर्टकट्सचा उपयोग करुन घेऊ शकतो.
या लिंकवर तुम्हाला आणखी काही शॉर्टकट्स बाबत माहिती मिळेल.
ही
एक आणि
दोन अशा आणखी काही लिंक्स देत आहे, ज्या तुम्हाला मदत करतील.
No comments:
Post a Comment