Wednesday, 22 February 2012

टोरंट - डाऊनलोड म्हणजे काय ?


0
0
आजकाल महाजालावर नेहमी कानावर पडत असलेला शब्द म्हणजे टोरंट.
टोरंट म्हणजे फक्त फाईल/गाणी/चित्रपट डाऊनलोड करणे एवढंच माहिती असते, पण कसे का ? या प्रश्नांची उत्तरे नसतात.
आपण या लेखातून याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
पीअर टू पीअर नेटवर्किंग म्हणजे टोरंट.
आता पीअर टू पीअर म्हणजे काय ?
टोरंटवरून तुम्ही ज्या फायली डाऊनलोड करत असता त्या कुठे सर्वरवर अथवा होस्टिंग साईटवर नसतात, त्या वापरकर्ताच्या संगणकात असतात.
म्हणजे उदा. मी एक फाईल डाऊनलोड करतो तेव्हा ती फाईल ज्या संगणकावर आहे तेथून (पीअर) मी डाऊनलोड करत असतो.
उदाहरण या चित्रामध्ये पहा.
आता, आपल्या संगणकावर असा पुर्ण प्रवेश देणे तो ही कोणाला ही, ते आपल्याला परवडणार नाही, म्हणून मध्ये एक कोणी तरी हवा हो त्यांचा प्रवेश फक्त त्या फाईलसाठी मर्यादीत करू शकेल, मग तेथे येतात मदतीला सॉफ्टवेअर.uTorrent, BitTorrent सारखी प्रणाली. ही / यासारखी प्रणाली असल्या शिवाय तुम्ही टोरंट डाऊनलोड करू शकत नाही.
एक ठाराविक फोल्डर (बाय डिफॉल्ट माय डाक्युमेंट/डाऊनलोड ) त्यासाठी ही प्रणाली निश्चित करते, त्या फोल्डर मधील फाईल सोडल्यातर दुसरा पिअर तुमच्या संगणकातील इतर फाईल्स हताळू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुर्ण फाईल एकाच संगणकावरून डाऊनलोड होत नाही. त्यासाठी हे सॉफ्टवेअर त्या फाईलचे छोटे छोटे विभाग (पॅकेट्स) करते व ज्या संगणकाचा स्पिड चांगला आहे तेथून आधी ते पॅकेट्स घेत असते. असे अनेक संगणकातून पॅकेट्स घेऊन मग ती फाईल तुमच्या संगणकावर डाऊनलोड होत असते.
येथे पहा
वरच्या खिडकी मध्ये डाऊनलोड होत असलेल्या फाईली दिसत आहेत व खालच्या खिडकीमध्ये त्या फाईल मधील माहिती दिसण्याची व्यवस्था आहे.
पहिल्या खिडकी मध्ये असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचे नाव.
२. नंबर
३. फाईलचा आकार
४. किती % डाऊनलोड झाले.
५. सद्य स्थिती
६. सिड्स - किती संगणकावरून / पिअर कडून फाईल घेतली जात आहे.
७. पिअर्स किती संगणका / पिअर तुमच्या कडून फाईल घेत आहेत.
८. डाऊनलोड होण्याचे स्पिड
९. अपलोड होण्याचे स्पिड
१०. या स्पिडनूसार डाऊनलोड होण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ.
११. एकून अपलोड झालेल्या फाईलची साईज.
दुसर्‍या खिडकी मध्ये (खालील) असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचा आकार व त्याचा ग्राफ
२. उपलब्धता व त्यांची माहिती
फाईल चे कुठले पॅकेट डाऊनलोड होत आहे, फाईल कुठे सुरक्षित ठेवली जात आहे, कुठून डाऊनलोड होत आहे, किती वेळ लागेल, किती डाऊनलोड झाले आहे, किती अपलोड झाले आहे यांची सर्व माहिती खालच्या खिडकीत मिळते.

हे झाले तुमच्या संगणकावर काय घडते या बद्दल.
आता तुम्हाला हवा असलेला टोरंट कसा शोधायचा ?
तर असा शोध घेण्यासाठी अनेक ट्रकर ऑनलाईन उपलब्ध आहेत. जी टोरंट प्रणाली तुम्ही वापराल त्यांचा देखील ट्रकर असतो, पण त्यापेक्षा ही चांगले व गुणवत्ता असलेली फाईल्स देणारे, फाईल व्हेरिफाय करून ती सुरक्षित आहे यांची खात्री देणारे भरपूर ट्रकर आहेत.
( सुचना: हे ट्रकर मुफ्त प्रणालीवर असतात, त्यामुळे त्यावरच्या जाहिरातीचा सुकाळ असतो, आपल्या जबाबदारीवर अश्या प्रकारचे साईट उघडा, नाहीतर सुरक्षेसाठी तुमच्या टोरंट प्रणालीचेच जाहिरातमुक्त संकेयस्थळ वापरा )
http://torrentz.eu
Torrentz नावाची प्रणाली ज्यांची आहे त्यांचाच हा ट्रकर आहे, हे एक प्रकारचे सर्च इंजीन आहे. जेथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फाईल शोधू शकता व डाऊन लोड करून घेऊ शकता. - जाहिरात मुक्त
http://www.picktorrent.com
हे देखील उत्तम सर्च इंजीन आहे, टोरंटसाठी. जाहिरात मुक्त
http://extratorrent.com/
हे एक वेगवान व भरपुर सिडर्स असलेले स्थळ, पण हे स्थळ आपल्या जबाबदारीवर उघडा, पुर्ण जाहिरातीनी भरलेले व (+A) जाहिरातीचा सुकाळ असलेले संकेतस्थळ आहे. पण अनेक चित्रपटांचे टोरंट येथे व्हेरिफाय केलेले मिळतात.
असे अनेक आहेत, नियमित वापरातून तुम्हाला तुमच्या आवडीचे टोरंट सर्च इंजीन मिळून जाईल.
आता या प्रकारच्या संकेतस्थळावरून फाईल कशी डाऊनलोड करावी.
आपण उदाहरण म्हणून एक संकेतस्थळ घेऊ या "http://torrentz.eu" व मला उबंटू हवे आहे तर मी सर्च मध्ये उबंटू टाईप करुन सर्चचे परिणाम पाहतो आहे.
आता हा निकाल पहा.
काय दिसत आहे.
Sponsored Links याखालील लिंक्सवर क्लिक करू नका पैसे मागतात पुढे जाऊन Big smile
त्यानंतर,
पहिल्याच नंबरच्या फाईल नावासमोर ubuntu desktop 10 10 i386 तुम्हाला एक हिरवा टिक मार्क  दिसेल. याचा अर्थ फाईल वापरकर्तानी व्हेरिफाय केली आहे, उत्तम आहे याची नोंद केली आहे.
त्यानंतर ही फाईल या संकेतस्थळावर कधी आली यांची माहिती दिली आहे 6 months ago 
त्या नंतर फाईलचा आकार दिसत आहे.
आता सर्वात महत्त्वाचे. जे नंबर दिसत आहेत ते काय ?
पहिला हिरव्या रंगातील नंबर 3,553 म्हणजे काय हे समजून घेऊ या.
ते आहेत सिडर्स, जे ऑनलाईन आहेत, ज्यांच्या संगणकातून तुम्ही ती फाईल घेणार आहात, हे जेवढे जास्त तेवढ्या पुर्ण वेगाने फाईल डाऊनलोड होईल. हे जेवढे कमी असतील तेव्हा फाईल डाऊनलोड साठी वेळ लागेल.
आता दुसरी जी दिसत आहे ती संख्या निळ्या रंगात 137
आता हे ते नमुने आहेत, जे फाईल डाऊन झाले की लगेच आपला पेअर बंद करतील, म्हणजेच फुकटे.. आपण काही देणे नाही फक्त घेणे हे तत्व असलेले 
पण भारतात महाजालाचा खर्च व अनलिमिटेड सेवांचे दर पाहता साहजिकच आहे हास्य
आता पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावर काय दिसते, ते पाहू या.
एक पुर्ण लिस्ट तुमच्या समोर येत आहे, जेथून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता.
खालील लिस्टमधील जे अद्यावत दिसत आहे त्याचा वापर करा म्हणजे फाईल लवकर डाऊनलोड होण्याचे चान्स वाढतील.
पुन्हा एकदा Sponsored Link कडे पाहू देखील नका wink
उदा. मी torlock.com हे वापरले.
आता मला ते वरील प्रमाणे दिसत आहे, ज्यामध्ये फाईलचे नाव, ते व्हेरिफाय आहे की नाही, 1819 seeders & 76 leechers किती आहेत. व डाऊनलोड साठी ऑप्शन.
येथे मी टोरंट डाऊनलोड निवडेन. तेथे .torrent नावाची फाईल डाऊनलोड होण्यासाठी परवानगी मागेल तेथे, डाऊनलोडची खिडकी आल्यावर त्यावर मी फाईल सेव्ह न करता ओपन असे क्लिक करेन जेणे करुन ती फाईल सरळ टोरंट प्रणाली मध्ये उघडेल व डाऊनलोड चालू होईल.

Saturday, 11 February 2012

सोशल नेटवर्किंग गरज की व्यसन ?


                            इंटरनेट क्षेत्रातील बदलामुळे जगभरातील कोणतीही माहिती एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होते. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही. मात्र इंटरनेटच्या फायद्या-तोट्याचे गणित अनेकांना अद्याप समजलेले नाही. सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हे व्यसनच असून, योग्य वेळी थांबवणे गरजेचे आहे.

सोशल नेटवर्किंग म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्‍नही अनेकांसमोर उभा राहतो. इंटरनेटचा वापर हा सोशल नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरला जातोय. सोशल नेटवर्किंगला भारतातल्या इंटरनेट युजरकडून सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच "गुगल' ही सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेली कंपनी प्रथम भारतातल्या युजरचा विचार करते. सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक, ट्विटर, एफबी, ऑर्कूट, चॅटिंग असे अनेक पर्याय युजर्सपुढे उपलब्ध आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भारतातला 75 टक्के युजर हा 35 वर्षाच्या आतील वयाचा आहे. भारतातील युजर इंटरनेटसाठी आठवड्याला किमान साडेबारा तास वेळ देतात. दिवसातले अनेक तास इंटरनेटवर घालविणाऱ्यांची संख्याही मोठी असून, दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

ट्विटरमुळे अनेक जण सेकंदा-सेकंदाला आपली वैयक्तिक माहिती अपलोड करताना दिसतात. शिवाय यू-ट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अपलोड करता येत असल्यामुळे दर सेकंदाला ठिकठिकाणचे व्हिडिओ अपलोड होताना दिसतात. जगात कोणतीही घटना घडली तरी काही वेळातच त्याचे व्हिडिओ यू ट्यूबर उपलब्ध होतात. सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहतात. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, अनेक जण मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे.



इंटरनेटसारख्या माध्यमामुळे अगदी मोकळेपणाने युजर्सला आपली मते समोरच्या व्यक्तीसमोर मांडता येतात. शिवाय, माहितीची देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत राहते. इंटरनेट विश्‍व हे माहितीचा खजिना असल्यामुळे प्रत्येक जण नवनवीन माहितीच्या शोधात असतो. सोशल नेटवर्किंगचे हे फायदे आहेत, यात तीळमात्र शंका नाही. परंतु काही प्रमाणात तोटेही आहेत, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. खरे तर सोशल नेटवर्किंगचा वापर आपण कसा करतो, यावर सर्व काही अवलंबून असते. मध्यंतरी सोशल नेटवर्किंगचा तोटाही अनेक देशांना बसला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर बंदी असावी, की काही प्रमाणात निर्बंध लादावेत, यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन्‌ तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा. अनेक जण फेसबुकवर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरातील सदस्यांशी बोलणे कमी झाले आहे. म्हणूनच सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते. मैदानी खेळही कमी होत चालल्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. इंटरनेटचे स्पीड कमी झाले तरी चिडखोरपणा वाढताना दिसतो. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे इंटरनेट ही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. परंतु सहा तासांहून अधिक काळ जर इंटरनेट वापरात असाल, तर व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजावे. यासाठी आपण स्वतः काही निर्बंध लादून घ्यायला हवेत. इंटरनेटमुळे जग जवळ येऊन ठेपले आहे, माहिती मिळत आहे, हे अगदी बरोबर. परंतु इंटरनेट नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढत असेल, काही सुचत नसेल तर ते मग व्यसनच. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जायचे की माहितीसाठी इंटरनेटचा वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविणेच योग्य ठरेल.

सोशल नेटवर्किंग हे खरोखरच प्रभावी माध्यम आहे. परंतु त्याच्या आहारी जाणे हेही एक व्यसनच. इंटरनेटमुळे एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र त्यातील धोक्‍यांपासून प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.

इंटरनेटचे फायदे -
  • जगभरातील नवनवीन घडामोडी समजण्यास मदत.
  • आपले मत मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ.
  • सोशल नेटवर्किंगसारखे अनेक पर्याय खुले.
  • काही सेकंदातच जगभरातून ई-मेल मिळू शकतात.
  • जगभरातील माहिती खजिना उपलब्ध.

इंटरनेटचे तोटे -
  • मैदानी खेळामुळे कमी झाल्यामुळे शारीरिक व्याधी.
  • मानसिक आजार होण्याची शक्‍यता.
  • चिडचिडेपणात वाढ.
  • वैयक्तिक माहितीचा इंटरनेट क्षेत्रात गैरवापर होण्याची शक्‍यता.
  • इंटरनेटच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांची चर्चा कमी होण्याची शक्‍यता.

संगणक Hibernate कसा करावा आणि त्याचे फायदे.



                                            मित्रांनो, Hibernate म्हणजे काय? हे आपण प्रथम बघू , आपण संगणकावर कोणतेही काम करत असताना. अचानक कोणतेतरी काम आठवते आणि बाहेर जावे लागते, परंतु संगणकावर आपले जे काही महत्वाचे काम चालू असते ते बरेचवेळा save केलेले नसते किंवा एकाचवेळी अनेक web browsers , ओपन केलेले असतात. आणि अशावेळी अचानक कुठे बाहेर जावे लागले तर आपण सगळ्या प्रोसेस बंद करत बसतो ,त्यामध्ये खूप वेळपण जातो आणि शिवाय आपण पुन्हा जेंव्हा संगणक चालू करतो तेंव्हा पुन्हा ह्याच सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात तसेच काय काम करत होतो हेसुद्धा कधीकधी विसरतो.    
                                            अशावेळी एक साधा आणि सोप्पा उपाय म्हणून Hibernate हा पर्याय उपयोगी पडतो. Hibernate मुळे आपण संगणकाच्या सगळ्या प्रोसेस आहे त्या स्थितीत ठेऊन संगणक बंद करू शकतो. संगणक Hibernate कसा करावा (Windows xp साठी )ते पुढील प्रमाणे :-

१. प्रथम संगणकावरील Start ह्या बटनावर क्लिक करा.
२. नंतर Control Panel वर क्लिक करा.
३. Control Panel मधील "Power Options" वर डबल क्लिक करा.
४. त्यानंतर एक विंडो ओपन होईल,त्या विंडो वर आपल्याला Power schemes, Advanced,Hibernate         आणि UPS  हे Options दिसतील.


५. त्यातील Hibernate वर क्लिक करा. आणि त्यातील Enable hibernation ह्या option पुढे क्लिक करा.
६. नंतर Apply करून ok वर क्लिक करा.आता तुमचा संगणक Hibernate साठी तयार आहे.
७. आता महत्वाचं म्हणजे संगणक बंद करताना हा option कसा select करायचा , जेंव्हा तुम्हाला संगणक Hibernate करायचा असेल तेंव्हा start मेनू मध्ये जाऊन Turn off computer वर क्लिक करा.
८. त्यानंतर एक विंडो दिसेल तेंव्हा shift बटन दाबून ठेवा , त्याचवेळी  आपल्याला एक बदल लक्षात येईल Stand  By  चे Hibernate मध्ये रुपांतर झालेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
९. अशाप्रकारे आपण आपला संगणक Hibernate करू शकतो. त्यामुळे आपला वेळ नक्कीच वाचेल आणि ज्या प्रोसेस आधी चालू असतील तश्याच स्थितीत संगणक पुन्हा चालू होईल.
                                                                                 
                                                                                       ( posted by Nishikant Manugade )

इंटरनेटवर देवनागरी (मराठी) भाषेतुन कसे लिहाल?



                               
खुप ठिकाणी अशी सोय उपलब्ध आहे.जिथे आपण आपल्या कीबोर्डच्या  सहाय्याने  इंग्लिश बटण्स्  दाबून मराठीतून  लिहितो. आणि  तो  मजकूर  कॉपी करुन  जिथे  हवा  त्या  ठिकाणी  पेस्ट  करतो. पण  जिथे  तो  मजकूर  आपण  पेस्ट  करतो  तिथेच  आपल्याला   डायरेक्ट   देवनागरी  लिपित  लिहिता  आलं  तरं!!!  जसं  मी  अत्ता ह्या  ब्लॉगवर  मराठीतून  लिहित  आहे. तशी  ब्लॉगरनेही  मराठीतून  लिहीण्याचीसोय उपलब्ध  करुन  दिली  आहे.  पण  त्यापेक्षाही खुप सोप्या पध्दतीने आपण फक्त ब्लॉगवरच नाही तर इंटरनेटवर कोठेही मराठीतून लिहू शाकतो. मी ब्लॉगरने उपलब्ध करुन दिलेली सोयही  वापरत  नाहिये  आणि  या  ब्लॉगवर डायरेक्ट मराठीतून लिहित आहे ते ‘लिपीकार’ या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने. माझ्यासारखंच तुम्हालाही जर इंटरनेटवर डायरेक्ट मराठीतून लिहायचं असेल, तर त्यासाठी प्रथम तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावं लागेल अणि ते कसं करायचं ते पुढीलप्रमाणे:-


                                                              Get paid to share your links!


१. लिपीकार.कॉम ह्या  वेबसाईटवर जा.
२.तिथे खालिल बाजुस लिपीकारची दोन  versions आहेत.
३.त्यामधील एक  Windows Software तर दुसरे Firefox साठी आहे.
४.Lipikaar Windows Software खालिल Download Now या option वर  click करा.
५.मग तुमचं नाव आणि E-mail देउन Download Lipikaar या बटणावर click करा.
६.त्यानंतर एक स्क्रिन दिसेल त्यामधिल आपली कोणती operating system असेल त्यापुढील बटणावर click करा.
७.सेव केलेली फाइल इन्स्टॉल करा.
८.इन्स्टॉल केल्यानंतर डेस्कटॉपवर ' लि ' असा एक शॉर्टकट येईल.




९.त्या शॉर्टकट वर double click करा.
१०.मग टास्कबारवर ' लि ' हा आयकॉन दिसेल.  
                                                                                                             
                                                        
                            


११.त्या आयकॉनवर click करुन Choose Language मधुन मराठी भाषा निवडा.
                        




१२.आता तुम्ही इंटरनेटवर मराठी लिहीण्यासाठी तयार आहात.
१३.आणि हो ! मराठी लिहीत असताना मधेच English देखिल लिहावं लागतं,त्यासाठी Ctrl + Alt + L ही short cut बटणस् दाबून भाषा बदलू  शकता.

driveby downloads - marathi