आजकाल महाजालावर नेहमी कानावर पडत असलेला शब्द म्हणजे टोरंट.
टोरंट म्हणजे फक्त फाईल/गाणी/चित्रपट डाऊनलोड करणे एवढंच माहिती असते, पण कसे का ? या प्रश्नांची उत्तरे नसतात.
आपण या लेखातून याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
टोरंट म्हणजे फक्त फाईल/गाणी/चित्रपट डाऊनलोड करणे एवढंच माहिती असते, पण कसे का ? या प्रश्नांची उत्तरे नसतात.
आपण या लेखातून याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
पीअर टू पीअर नेटवर्किंग म्हणजे टोरंट.
आता पीअर टू पीअर म्हणजे काय ?
आता पीअर टू पीअर म्हणजे काय ?
टोरंटवरून तुम्ही ज्या फायली डाऊनलोड करत असता त्या कुठे सर्वरवर अथवा होस्टिंग साईटवर नसतात, त्या वापरकर्ताच्या संगणकात असतात.
म्हणजे उदा. मी एक फाईल डाऊनलोड करतो तेव्हा ती फाईल ज्या संगणकावर आहे तेथून (पीअर) मी डाऊनलोड करत असतो.
म्हणजे उदा. मी एक फाईल डाऊनलोड करतो तेव्हा ती फाईल ज्या संगणकावर आहे तेथून (पीअर) मी डाऊनलोड करत असतो.
उदाहरण या चित्रामध्ये पहा.
आता, आपल्या संगणकावर असा पुर्ण प्रवेश देणे तो ही कोणाला ही, ते आपल्याला परवडणार नाही, म्हणून मध्ये एक कोणी तरी हवा हो त्यांचा प्रवेश फक्त त्या फाईलसाठी मर्यादीत करू शकेल, मग तेथे येतात मदतीला सॉफ्टवेअर.uTorrent, BitTorrent सारखी प्रणाली. ही / यासारखी प्रणाली असल्या शिवाय तुम्ही टोरंट डाऊनलोड करू शकत नाही.
एक ठाराविक फोल्डर (बाय डिफॉल्ट माय डाक्युमेंट/डाऊनलोड ) त्यासाठी ही प्रणाली निश्चित करते, त्या फोल्डर मधील फाईल सोडल्यातर दुसरा पिअर तुमच्या संगणकातील इतर फाईल्स हताळू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुर्ण फाईल एकाच संगणकावरून डाऊनलोड होत नाही. त्यासाठी हे सॉफ्टवेअर त्या फाईलचे छोटे छोटे विभाग (पॅकेट्स) करते व ज्या संगणकाचा स्पिड चांगला आहे तेथून आधी ते पॅकेट्स घेत असते. असे अनेक संगणकातून पॅकेट्स घेऊन मग ती फाईल तुमच्या संगणकावर डाऊनलोड होत असते.
येथे पहा
वरच्या खिडकी मध्ये डाऊनलोड होत असलेल्या फाईली दिसत आहेत व खालच्या खिडकीमध्ये त्या फाईल मधील माहिती दिसण्याची व्यवस्था आहे.
पहिल्या खिडकी मध्ये असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचे नाव.
२. नंबर
३. फाईलचा आकार
४. किती % डाऊनलोड झाले.
५. सद्य स्थिती
६. सिड्स - किती संगणकावरून / पिअर कडून फाईल घेतली जात आहे.
७. पिअर्स किती संगणका / पिअर तुमच्या कडून फाईल घेत आहेत.
८. डाऊनलोड होण्याचे स्पिड
९. अपलोड होण्याचे स्पिड
१०. या स्पिडनूसार डाऊनलोड होण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ.
११. एकून अपलोड झालेल्या फाईलची साईज.

दुसर्या खिडकी मध्ये (खालील) असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचा आकार व त्याचा ग्राफ
२. उपलब्धता व त्यांची माहिती
२. उपलब्धता व त्यांची माहिती
फाईल चे कुठले पॅकेट डाऊनलोड होत आहे, फाईल कुठे सुरक्षित ठेवली जात आहे, कुठून डाऊनलोड होत आहे, किती वेळ लागेल, किती डाऊनलोड झाले आहे, किती अपलोड झाले आहे यांची सर्व माहिती खालच्या खिडकीत मिळते.
हे झाले तुमच्या संगणकावर काय घडते या बद्दल.
आता तुम्हाला हवा असलेला टोरंट कसा शोधायचा ?
आता तुम्हाला हवा असलेला टोरंट कसा शोधायचा ?
तर असा शोध घेण्यासाठी अनेक ट्रकर ऑनलाईन उपलब्ध आहेत. जी टोरंट प्रणाली तुम्ही वापराल त्यांचा देखील ट्रकर असतो, पण त्यापेक्षा ही चांगले व गुणवत्ता असलेली फाईल्स देणारे, फाईल व्हेरिफाय करून ती सुरक्षित आहे यांची खात्री देणारे भरपूर ट्रकर आहेत.
( सुचना: हे ट्रकर मुफ्त प्रणालीवर असतात, त्यामुळे त्यावरच्या जाहिरातीचा सुकाळ असतो, आपल्या जबाबदारीवर अश्या प्रकारचे साईट उघडा, नाहीतर सुरक्षेसाठी तुमच्या टोरंट प्रणालीचेच जाहिरातमुक्त संकेयस्थळ वापरा )
http://torrentz.eu
Torrentz नावाची प्रणाली ज्यांची आहे त्यांचाच हा ट्रकर आहे, हे एक प्रकारचे सर्च इंजीन आहे. जेथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फाईल शोधू शकता व डाऊन लोड करून घेऊ शकता. - जाहिरात मुक्त
Torrentz नावाची प्रणाली ज्यांची आहे त्यांचाच हा ट्रकर आहे, हे एक प्रकारचे सर्च इंजीन आहे. जेथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फाईल शोधू शकता व डाऊन लोड करून घेऊ शकता. - जाहिरात मुक्त
http://www.picktorrent.com
हे देखील उत्तम सर्च इंजीन आहे, टोरंटसाठी. जाहिरात मुक्त
http://extratorrent.com/
हे एक वेगवान व भरपुर सिडर्स असलेले स्थळ, पण हे स्थळ आपल्या जबाबदारीवर उघडा, पुर्ण जाहिरातीनी भरलेले व (+A) जाहिरातीचा सुकाळ असलेले संकेतस्थळ आहे. पण अनेक चित्रपटांचे टोरंट येथे व्हेरिफाय केलेले मिळतात.

असे अनेक आहेत, नियमित वापरातून तुम्हाला तुमच्या आवडीचे टोरंट सर्च इंजीन मिळून जाईल.
आता या प्रकारच्या संकेतस्थळावरून फाईल कशी डाऊनलोड करावी.
आपण उदाहरण म्हणून एक संकेतस्थळ घेऊ या "http://torrentz.eu" व मला उबंटू हवे आहे तर मी सर्च मध्ये उबंटू टाईप करुन सर्चचे परिणाम पाहतो आहे.
आता हा निकाल पहा.
काय दिसत आहे.
Sponsored Links याखालील लिंक्सवर क्लिक करू नका पैसे मागतात पुढे जाऊन
त्यानंतर,
काय दिसत आहे.
Sponsored Links याखालील लिंक्सवर क्लिक करू नका पैसे मागतात पुढे जाऊन
त्यानंतर,
पहिल्याच नंबरच्या फाईल नावासमोर ubuntu desktop 10 10 i386 तुम्हाला एक हिरवा टिक मार्क दिसेल. याचा अर्थ फाईल वापरकर्तानी व्हेरिफाय केली आहे, उत्तम आहे याची नोंद केली आहे.
त्यानंतर ही फाईल या संकेतस्थळावर कधी आली यांची माहिती दिली आहे 6 months ago
त्या नंतर फाईलचा आकार दिसत आहे.
आता सर्वात महत्त्वाचे. जे नंबर दिसत आहेत ते काय ?
त्या नंतर फाईलचा आकार दिसत आहे.
आता सर्वात महत्त्वाचे. जे नंबर दिसत आहेत ते काय ?
पहिला हिरव्या रंगातील नंबर 3,553 म्हणजे काय हे समजून घेऊ या.
ते आहेत सिडर्स, जे ऑनलाईन आहेत, ज्यांच्या संगणकातून तुम्ही ती फाईल घेणार आहात, हे जेवढे जास्त तेवढ्या पुर्ण वेगाने फाईल डाऊनलोड होईल. हे जेवढे कमी असतील तेव्हा फाईल डाऊनलोड साठी वेळ लागेल.
ते आहेत सिडर्स, जे ऑनलाईन आहेत, ज्यांच्या संगणकातून तुम्ही ती फाईल घेणार आहात, हे जेवढे जास्त तेवढ्या पुर्ण वेगाने फाईल डाऊनलोड होईल. हे जेवढे कमी असतील तेव्हा फाईल डाऊनलोड साठी वेळ लागेल.
आता दुसरी जी दिसत आहे ती संख्या निळ्या रंगात 137
आता हे ते नमुने आहेत, जे फाईल डाऊन झाले की लगेच आपला पेअर बंद करतील, म्हणजेच फुकटे.. आपण काही देणे नाही फक्त घेणे हे तत्व असलेले
पण भारतात महाजालाचा खर्च व अनलिमिटेड सेवांचे दर पाहता साहजिकच आहे
आता हे ते नमुने आहेत, जे फाईल डाऊन झाले की लगेच आपला पेअर बंद करतील, म्हणजेच फुकटे.. आपण काही देणे नाही फक्त घेणे हे तत्व असलेले
पण भारतात महाजालाचा खर्च व अनलिमिटेड सेवांचे दर पाहता साहजिकच आहे
आता पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावर काय दिसते, ते पाहू या.
एक पुर्ण लिस्ट तुमच्या समोर येत आहे, जेथून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता.
खालील लिस्टमधील जे अद्यावत दिसत आहे त्याचा वापर करा म्हणजे फाईल लवकर डाऊनलोड होण्याचे चान्स वाढतील.
पुन्हा एकदा Sponsored Link कडे पाहू देखील नका
उदा. मी torlock.com हे वापरले.
खालील लिस्टमधील जे अद्यावत दिसत आहे त्याचा वापर करा म्हणजे फाईल लवकर डाऊनलोड होण्याचे चान्स वाढतील.
पुन्हा एकदा Sponsored Link कडे पाहू देखील नका
उदा. मी torlock.com हे वापरले.
आता मला ते वरील प्रमाणे दिसत आहे, ज्यामध्ये फाईलचे नाव, ते व्हेरिफाय आहे की नाही, 1819 seeders & 76 leechers किती आहेत. व डाऊनलोड साठी ऑप्शन.
येथे मी टोरंट डाऊनलोड निवडेन. तेथे .torrent नावाची फाईल डाऊनलोड होण्यासाठी परवानगी मागेल तेथे, डाऊनलोडची खिडकी आल्यावर त्यावर मी फाईल सेव्ह न करता ओपन असे क्लिक करेन जेणे करुन ती फाईल सरळ टोरंट प्रणाली मध्ये उघडेल व डाऊनलोड चालू होईल.
No comments:
Post a Comment