Friday, 9 March 2012

ऑनलाईन-ऑफलाईन मराठी लिहिणे झाले सोप्पे



मंडळी  आता ऑनलाईन-ऑफलाईन मराठी लिहिणे झाले खुपच सोप्पे,अनेक वेळां मला विचारले जाते की ऑनलाईन-ऑफलाईन मराठी  मध्ये कसे लिहावे...आता तर हे खुपच सोप्पे झाले आहे त्यासाठी असलेल्या विविध पद्धती पैकी सर्वांत सोप्पी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.जर तुम्हाला ऑफिस मध्ये असताना मराठी मध्ये लिहायचे असेल तर सर्वांत सोप्पा मार्ग आहे   ...google transliteration चा वापर करणे.त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा. 


आणि  मराठी भाषेची निवड करून मराठी मध्ये लिहायला सुरुवात  करा,

        
         निशिकांत मानुगडे सोबत
        






१) NARSINHANAGAR>>>>नरसिंहनगर २) KOMAL>>>कोमल  जे तुम्ही  इंग्रजी मध्ये लिहाल ते मराठी मध्ये उमटेल मराठी मधून लिहिताना  मध्ये इंग्रजी शब्द वापरायचे असतील तर "Ctrl+ g " या दोन्ही की एकत्र दाबा.

समजा  तुम्हाला तुमच्या घराच्या  संगणकावर  मराठी ऑनलाईन-ऑफलाईन लिहायचे असेल तर प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा .



तिथे  चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणेNew!  Download Google Transliteration IME



पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या. 

जे  पान उघडेल त्यावर खालील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे choose your IME language मधून मराठीची निवड करा.मग download google IME वर टिचकी दया.

असे  केल्याने एक छोटा googlemarathiinputsetup.exe प्रोग्राम डाउनलोड होईल...तो डाउनलोड झाल्यावर त्या googlemarathiinputsetup.exe फाईलवर टिचकी दया आणि तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.एकदा ही नीट पार पडली की तुमच्या संगणकावर EN  असे चिन्ह दिसले त्यावर टिचकी दया.


आणि मराठीची निवड करून मराठी मध्ये लिहायला सुरुवात करा. :-)


टीप – जर आपल्या संगणकावर windows xp sp2 व windows xp sp3 असेल Language INSTALL करणे गरजचे आहे
     




IMEs cannot be installed or upgraded on a system that doesn't already support IMEs in the same language that you are installing. To enable Indic IME, go to control panel - > regional and Language. Select Language Tab, and check the option “Install files for complex scripts and left-to-right language and insert Win XP CD in your CD-ROM drive.






1.     Run Marathi Setup.exe and follow the instructions in the setup program.
2.     Reboot your system.


Adding Input Locale 



1.  Open Text Services in Control Panel.
2.     Select Keyboard under MA in Installed Services.  Click Add.
3.     Select Marathi in Input Language, check Keyboard Layout /IME box. And Select Marathi Indic IME 1[V5.0].

          

4.     Click OK.




1.     After installing Indic IME start any Office application, WordPad or Notepad.
2.     Click the Language Indicator located in the System Tray on the right side of the Windows taskbar, and click to select “Indic IME 1” from the shortcut menu that appears.
3.     Start typing in Marathi.



धन्यवाद,
तुमचा मित्र,

निशिकांत मानुगडे

Tuesday, 6 March 2012

नको असलेल्या 'वेब साईट्स' आता कुलुपबंद करु शकता!!!


सर्वांनाच सतावत असलेली एक समस्या आंतरजालाची व्यसनाधीनता. आपल्या व्यसनाधिनतेवर आपणच काबु ठेवु शकतो हाच त्यावर उपाय आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत संगणकावर आपण नियंत्रण ठेवणे हा एक कठोर उपाय आपल्याला नाईलाजास्तव अवलंब करणे भाग पडते. तसेच फेसबुक सारख्या 'सोशल नेटवर्कींग साईट्स किंवा 'पोर्नोग्राफिक साईटस' चे व्यसन आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्या यावर काहीतरी उपाय हवा असे सर्वच सुजाण पालकांना वाटत असते. मायबोलीवर होणार्‍या अनेक चर्चांमधुन हा मुद्दा अधोरेखित होत असतो.


यावर एक उपाय म्हणजे आपल्या संगणकावर Internet Parental Control किंवा Free Website Blocker अशा प्रकारचे सॉफ्टवेअर ईन्स्टॉल करणे.

http://www.thewebblocker.com या साईटवर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहे. यात आपण नको त्या साईटस ब्लॉक करु शकतो किंवा 'content filtering' चा वापर करुन त्या प्रकारच्या सरव साईट्स वर बंदी आणु शकतो. माझ्या काही ग्राहकांकडे मी हे वापरले आहे आणि चांगल्याप्रकारे काम करते असा अनुभव आहे.

Monday, 5 March 2012

आउटसोर्सिंग

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ही 2009 साली केलेल्या निरिक्षणांप्रमाणे जगातली तिसर्यात क्रमांकाची कंपनी म्हणून गणली जाते. प्रत्येक घरात व ऑफिसमधल्या प्रत्येक टेबलावर, संगणक व त्यात या कंपनीची संगणक प्रणाली, असलीच पाहिजे हे या कंपनीने प्रथम ठरविलेले ध्येय होते. आपल्यापैकी बहुतांशी लोक वापरत असलेले विन्डोज हे सॉफ्टवेअर, तसेच ज्या सॉफ्टवेअरद्वारे मी हा लेख टंकलेखित करतो आहे ती मायक्रोसॉफ्ट वर्ड ही प्रणाली ही या कंपनीचीच उत्पादने आहेत. कोणताही संगणक अतिशय कार्यक्षमतेने चालावा यासाठी त्याच्या अंतर्गत प्रणालींचे कार्य उत्तम रितीने चालणे आवश्यकच असते. तेच कार्य विन्डोज ही प्रणाली आपल्या सर्वांच्या संगणकांच्या मध्ये करत असते. थोडक्यात सांगायचे तर संगणकांचे जग केवळ मायक्रोसॉफ्ट उत्पादनांवर चालते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये.




आज मी हे मायक्रोसॉफ्ट पुराण का चालू केले आहे? अशी शंका बर्या च जणांना येण्याची शक्यता आहे. पण त्याला कारण आहे आजच्या वर्तमानपत्रांमध्ये आलेली एक ठळक बातमी. ही बातमी सगळ्यांनी बघितली असेलच असे नाही. ही बातमी अशी आहे की ‘ मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने, भारतातील एक अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी ‘ इन्फोसिस ‘ ला एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची अंदाजे किंमत अमेरिकन डॉलर्स 100 मिलियन ( 500 कोटी रुपये) पेक्षाही जास्त असणार आहे.’ आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे ही ऑर्डर आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे स्वत:चे जे संगणक, 104 देशातल्या 450 स्थानांच्यावर आहेत, त्या सर्व संगणकांना, आवश्यक अशा applications, devices, and databases या क्षेत्रातल्या माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवण्याबद्दल. या सेवा ‘इन्फोसिसने पुरवून, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जगभराचे कार्य सुलभ व सुरळीत रित्या चालू ठेवावे अशी मायक्रोसॉफ्ट कंपनीची अपेक्षा आहे.

या सेवांच्यात मायक्रोसॉफ्ट चालवत असलेल्या मदत केंद्राचे कार्य आवश्यक कार्यक्षमतेने चालू राहील या साठी आवश्यक तो पाठिंबा इन्फोसिस पुरवेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सेवा इन्फोसिसने पुरवल्यावर अशी अपेक्षा आहे की या सेवा स्वत: पुरवण्यासाठी मायक्रोसॉफ्टला जो खर्च येतो त्यात खूपच बचत होईल.


आहे की नाही गंमत. आपल्या सर्वांचे संगणक कार्यक्षमतेने व सुरळीत चालावे या साठी सर्व सेवा मायक्रोसॉफ्ट पुरवते. पण स्वत:च्या संगणकांसाठी मात्र या सेवा बाहेरून घेतल्या तर आपले खूप पैसे वाचतील यासाठी त्या सेवा हीच कंपनी बाहेरून घेणार आहे. अर्थात यात चुकीचे असे काहीच नाही. कोणतीही कंपनी आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल हे सतत बघत असते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या ऑर्डरचे काही नवल वाटायला नको.


आता ही कंपनी जगातली तिसर्याे क्रमांकाची कंपनी असो किंवा चार माणसे कामावर ठेवून छोट्या ऑर्डर पूर्ण करणारी खाजगी वैयक्तिक मालकीची संस्था असो. मूळ तत्व तर तेच राहते. अगदी अशा छोट्या संस्थाना सुद्धा विक्री कर, आय कर, या साठी सल्लागार असतातच. अगदी हिशोब लिहिण्याचे काम सुद्धा बर्यािच वेळा बाहेर दिले जाते. अलीकडे या काम बाहेर देण्याला आउटसोर्सिंग असे नाव आहे. अलीकडे सरकारी खात्यांमधे सुद्धा आउटसोर्सिंगचे खूळ प्रचंड आहे. मात्र तिथले कारण निराळे असावे. खात्याचे कर्मचारी काम करतच नसल्याने तिथे हे बहुदा करत असावेत असा माझा अंदाज आहे.


चाळीस वर्षांपूर्वी मी माझा व्यवसाय जेंव्हा चालू केला होता तेंव्हा सुरवातीस सर्व हिशोब मला तोंडपाठ असत. काही दिवसांनंतर हे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मी प्रथम एक लेखनिक कामावर ठेवला. परंतु माझ्या असे लक्षात आले की त्याला दिवसात 1 तासभर सुद्धा काम नसे. त्यामुळे त्याला डच्चू देऊन मी हे काम एका चार्टर्ड अकाउंटंटला दिले. तो काम व्यवस्थित करत असे. पण मला जेंव्हा काही माहिती हवी असे तेंव्हा ती लगेच मिळत नसे. तसेच त्याचे डेबिट- क्रेडिट मला समजत नसे.

त्यामुळे काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. शेवटी मी एक संगणक व व त्यावर वापरता येईल व हिशोब आणि इतर आनुषंगिक गोष्टी त्यावरून कळतील अशी एक संगणक प्रणाली खरेदी केली. ही प्रणाली वापरण्यास सोपी असल्याने एक लेखनिक रोज तासभर माझ्याकडे येऊन त्यात नोंदी करत असे. हा लेखनिक 1 तासच येत असल्याने त्याच्यावरचा माझा खर्च साहजिकच एकदम कमी झाला. इतर कोणत्याही वेळी मला कोणतीही माहिती हवी असली तरी मला ती एक क्षणात संगणकामुळे मिळत असे. माझ्यासारखे अनेक छोटे व्यावसायिक संगणक आज सामान्यपणे वापरताना दिसतात. आपल्या धंद्यावरचे आपले नियंत्रण या संगणक प्रणालींमुळे उत्तम राहते यात शंकाच नाही.


पन्नास शंभर वर्षांपूर्वी जे कारखाने चालत त्यात उत्पादनास आवश्यक असे सर्व सुटे भाग मूळ रॉ मटेरियलपासून त्या कारखान्यातच बनत. ते सुटे भाग बाहेरून करून घेतले तर धंद्यातील आपले आराखडे बाहेरचे लोक चोरतील अशी एक भिती उद्योगधंद्यांना वाटत असली पाहिजे. परंतु असे होण्यापासून कायदेशीर मार्ग अवलंबता येतात हे लक्षात आल्यानंतर कारखान्यांनी सुट्या भागांचे आउटसोर्सिंग मोठ्या प्रमाणात चालू केले. 1960 किंवा 70 च्या दशकात प्रत्येक मोठ्या कारखान्याभोवती अशा छोट्या छोट्या वर्कशॉप्सचे जाळेच निर्माण झालेले असे. पुढे या छोट्या वर्कशॉप्समधल्या सुट्या भागांची गुणवत्ता आवश्यक ती आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीच या मोठ्या कारखान्यांना खूप खर्च येऊ लागला त्यामुळे मोजकेच सप्लायर्स ठेवायचे व गुणवत्ता राखण्याचे काम त्यांच्यावरच सोपवायचे अशी कल्पना रूढ झाली व आजमितीला तीच प्रचलित आहे.

पुरवठादार असंख्य असोत किंवा मोजकेच आउटसोर्सिंगचे तत्व तेच राहिले. त्यात काही बदल झाला नाही. आता तर या आउटसोर्सिंगवर देश किंवा कालाचेही बंधन राहिलेले नाही. दुसर्याझ देशामधे जिथे लेबर चार्जेस कमी आहेत तिथे आपल्या उत्पादनाचे सुटे भाग आउटसोर्स करण्यास कंपन्या अजिबात मागे पुढे पहात नाहीत.

मोठे उद्योगधंदे, कार्यालये यांना इतरही अनेक सेवा लागतात. उदाहरणार्थ कॅंटीन, स्वच्छता कर्मचारी वगैरे. प्रथम या उद्योगांकडे स्वत:चे कर्मचारी असत. यावर उत्पादनास अनावश्यक खर्च फार होतो हे लक्षात आल्यावर या सेवा पण आउटसोर्स कराव्या अशी कल्पना निघाली. आज सर्व मोठ्या उद्योगांच्यात या सर्व सेवा बाहेरच्या ठेकेदारांमार्फत पुरवल्या जातात.

आज प्रत्येक उद्योग किंवा मोबाईल फोन सारख्या अनेक सेवा पुरवणारे यांना प्रचंड स्पर्धा सतत जाणवत असते. या स्पर्धेत टिकून रहायचे असले तर खर्च कमी करणे आवश्यकच बनते. आउटसोर्सिंग हा खर्च कमी करण्याचा अगदी रामबाण उपाय असल्याने तो जगभर अतिशय लोकप्रिय होत चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष कितीही कडक विधाने प्रत्यक्षात करोत. जोपर्यंत आउटसोर्सिंग करून आपला फायदा वाढणार आहे हे अमेरिकन कंपन्यांना दिसते आहे तोपर्यंत आउटसोर्सिंग चालूच रहाणार यात मला तरी शंका वाटत नाही.

Wednesday, 29 February 2012

'जीमेल'वरूनही आता कॉल करा!




कॉम्पुटरवरून फोन लावणे ही कल्पना आजवर आपल्याला अगदी अशक्‍य वाटणारी; परंतु गुगलने ते आता शक्‍य केले आहे. फोनचा वापर न करताही थेट गुगलवरूनच आपल्याला बोलता येणार आहे. अर्थात, भारतात याला परवानगी नाही; परंतु जागतिक पातळीवर ही कल्पना खूप पॉप्युलर ठरणार आहे.



इंटरनेटपासून सुरवात करून इतरही व्यवसायांमध्ये आपले हातपाय रुजवायचा जोरदार प्रयत्न करणाऱ्या "गूगल'नं आधी स्वतःचा मोबाईल फोन बनवला आणि आता तर "गूगल' जगात सर्वांत जास्त लोकप्रिय असलेल्या त्यांच्या "जीमेल' या इमेलमधूनच कोणालाही करायची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. म्हणजेच "जीमेल' वापरणाऱ्यांना त्यांच्या "जीमेल'च्या मेनूमध्येच कोणालाही फोन करायची एक लिंक दिसेल. त्यावर क्‍लिक केले, की ज्या माणसाला फोन करायचा, त्याचा नंबर टाईप करायचा, की झाले! "जीमेल' त्या माणसाला फोन लावेल आणि "जीमेल' युजर त्याच्या संगणकावर स्पीकर आणि मायक्रोफोन वापरून त्या फोन लावलेल्या माणसाशी नेहमीसारखा बोलू शकेल!


अर्थातच गूगल ही कंपनी या प्रकारची सुविधा पुरवणारी पहिली कंपनी मात्र अजिबात नाही. कित्येक कंपन्यांनी यासंबंधी आधीही प्रयत्न केले आहेत. त्यातील सर्वांत यशस्वी ठरलेली कंपनी म्हणजे "स्काईप'. "स्काईप'ची सुविधा वापरून सुरवातीला लोक आपल्या संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फोन करू शकायचे. त्यासाठी फोन करणारा आणि ज्या माणसाच्या संगणकावर फोन करायचा आहे, तो अशा दोघांनाही "स्काईप' कंपनीकडून ठराविक दरानं ही सुविधा विकत घ्यावी लागायची. नंतर हळूहळू "स्काईप'नं केवळ एक संगणकावरून दुसऱ्या संगणकावरच फोन करू देण्यापेक्षा आपल्या नेहमीच्या लॅंडलाइनवरून संगणकावर किंवा संगणकावरून लॅंडलाइनवर फोन करायची सुविधा पण उपलब्ध करून दिली. हे सगळं खूप लोकप्रिय ठरलं. कारण याची किंमतसुद्धा खूपच कमी होती. अजूनही "स्काईप' ही एक स्वतंत्र कंपनीच आहे. आता तिला "सिस्को' कंपनी विकत घेणार किंवा "स्काईप'चा "आयपीओ' शेअर बाजारात येणार, असं म्हटलं जातं.

त्यानंतर आता "गूगल'नं "जीमेल'मधूनच कुणालाही फोन लावयाची किंवा कुठूनही जीमेल युज करणाऱ्या व्यक्तीच्या संगणकाला फोन लावायची सुविधा उपलब्ध करून दिली, तर साहजिकच "स्काईप'च्या दृष्टीनं ही मोठी डोकेदुखीच ठरेल. कारण "स्काईप'नं अतिशय स्वस्तात लाखो लोकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवेला आता गूगल जोरदार प्रतिकार करून "स्काईप'ला मोठ्या प्रमाणावर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकणार, हे नक्की.

हा प्रकार चालतो कसा?

हा सगळा प्रकार तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं कसा चालतो? जेव्हा स्काईप किंवा आता जीमेल वापरून संगणक वापरणारा एक माणूस जेव्हा संगणक वापरणाऱ्या व्यक्तीला फोन करतो तेव्हा काय घडतं? जसं इंटरनेटवरून नेहमी आपण पाठवलेल्या ईमेल किंवा इतर सगळी माहिती संगणकांच्या जाळ्यांमधून एकीकडून दुसरीकडे नेली जाते,
त्याच तत्त्वावर आता आपलं बोलणं एकीकडून दुसरीकडे नेलं जातं. म्हणजेच आपण जे बोलतो त्याचं रूपांतर आपला संगणक "स्काईप' कंपनीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून "बिट्‌स'मध्ये करून टाकतो. मग इंटरनेटमधून ज्याप्रमाणे इमेल किंवा इतर माहिती जशी नेली जाते;

तसेच आपल्या आवाजाचे "बिट्‌स' पण एकीकडून दुसरीकडे नेले जातात. दुसरीकडच्या संगणकावर हे बिट्‌स पोहोचले, की तिथल्या स्काईप सॉफ्टवेअरच्या मदतीने तो संगणक या बिट्‌सचे रूपांतर पुन्हा आपल्या मूळच्या आवाजात करतो आणि त्यामुळे दुसऱ्या टोकाकडील व्यक्तीला आपलं बोलणं त्याच्या संगणकावर ऐकू येतं. तो माणूस बोलला की अगदी हाच घटनाक्रम पुन्हा होतो, फक्त उलट दिशेनं; आणि त्यामुळे आता आपल्याला त्या माणसाचं बोलणं आपल्या संगणकावर ऐकू येतं.

 एका संगणकापासून दुसऱ्या संगणकापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा आपला आवाज अशा प्रकारे नेला जातो, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला "व्हॉईस ओव्हर आयपी (व्हीओआयपी)' असे म्हणतात. "स्काईप' आणि आता "गूगल' प्रामुख्यानं हेच तंत्रज्ञान वापरणार. यात नेहमीच्या टेलिफोन केबल्सचा वापर अजिबात होत नसल्यामुळे त्यात फक्त इंटरनेट वापरायचा खर्च आणि "स्काईप'! किंवा आता "गूगल' यांची फी, इतकाच खर्च येतो.

म्हणूनच हा प्रकार खूप स्वस्त असतो. जेव्हा संगणकावरून लॅंडलाइनला किंवा लॅंडलाइनवरून संगणकाला फोन करायचा असतो, तेव्हा मात्र त्यात फक्त इंटरनेटचा वापर न होता टेलिफोनच्या जाळ्याचा थोडा तरी वापर करावा लागतो आणि म्हणून या सुविधेसाठी नेहमीच्या टेलिफोन कॉलपेक्षा स्वस्त; पण फक्त संगणक ते संगणक याहून थोडा जास्त, असा मधला खर्च येतो.

भारतात या सगळ्याला अजून परवानगी नाही, कारण सरकारला टेलिफोन कंपन्यांचंही हित जपायचं आहे. पण जागतिक पातळीवर मात्र "गूगल'ची ही चाल नवीच धूम माजवणार यात शंकाच नाही!

Thursday, 23 February 2012

सायबर गुन्हे घडू नयेत या करीता


मागील ब-याच दिवसापासून इंटरनेट द्वारे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून यात प्रामुख्याने अश्लील प्रोफाइल तयार करणे, क्रेडीट कार्ड चा गैर वापर करणे इत्यादी गुन्हांचा समावेश आहे.

 इंटरनेट द्वारे नेमके कशाप्रकारे गुन्हे घडू शकतात व सामान्य जनतेने या संदर्भात कोणती काळजी घ्यावी
अनेक ईमेल अकाऊंट धारकांना अनोळखी व्यक्तीकडून अचानकपणे खालील प्रमाणे ईमेल (Unsolicited / Spam email) येतात

-  आपणास बक्षिस लागले आहे. मोठया रक्कमेची लॉटरी लागली आहे.
-  
परदेशात चांगल्या नोकरीची संधी आहे

  मोठ्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली
-   
आपला नातेवाईक परदेशात आजारी आहे किंवा अडचणीत आहे किंवा अपघातात मरण पावला आहे   त्याला मदत करावी

 .असा इमेल आपल्या मित्राच्या नातेवाईकाचा इमेल  हॅक करून येऊ शकतो.
-
दलाली मध्ये मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

- फ्रेंड्स क्लब मेंबर नावाची संस्था उघडली आहे त्यासाठी मेम्बर व्हा.
-
बॅक किवा आर्थिक संस्थेचे हुबेहूब बोधचिन्ह असलेले ईमेल-मध्ये अकौंट अपडेट करणे.
-
आपले बँकेचे खाते हे कमिशन घेवून पैसे पाठविण्यासाठी वापरू द्यावे.

- धर्मदाय संस्था आहे असे सांगून आपल्या खात्यावर दान करणा-या व्यक्ती पैसे जमा करतील त्यातली आपण २० % रक्कम कमिशन म्हणून ठेवून घ्यावी व इतर रक्कम दिलेल्या खात्यात जमा करावी.

- नोकरीसाठी इतरांसाठी पाठविलेल्या बायोडाटाद्वारे  आपणास नोकरीचे अपॉइंन्टमेंट लेटर देऊन वेगावेगळे चार्जेस साठी रु.५०००/-, १०,०००/- रक्कमेची मागणी करतील.

- परदेशातून/बाहेर गावावरून आमचे पैसे येणार आहे आपल्या बॅकेंतील खात्याचा व ए.टी.म.कार्ड चा वापर करून द्या त्याकरिता रु.५०००/-तुम्हाला भाडे देऊ असे म्हणतील 
 .
-
संगणक इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी विषयातील मान्यता प्राप्त संस्थेचे परीक्षाकेंद्र/प्रमानपत्र देतो असे सांगून त्याची रक्कम बॅकेंत भरण्यास सांगतील.

तसेच वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमाने विशेषता: www.orkut .com वेबसाईटवर अश्लील प्रोफाइल तयार करून बदनामी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने तरूण तरुणीच्या नावाने अशलील प्रोफाइल फोटोसह तयार करून त्यावर फोन नंबर दिले जातात 

 तसेच अशलील संदेश पाठविले जातात. याकरिता कोल्हापूर जिल्हा पोलिसाकडून सूचित करण्यात येते कि, इंटरनेटचा वापर करताना काळजीपूर्वक वापर करण्यात यावा शक्यतो आपले फोटो अपलोड करू नये.

इंटरनेटद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपण खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.

- अनोळखी व्यक्तीकडून आलेले Unsolicited ईमेल उघडू नये. यासोबतच्या अटॅचमेंट बघू नयेत यासोबत किलॉगर या सॉफ्टवेअर द्वारे अनोळखी व्यक्ती आपला पासवर्ड, बँकेचा पिन नंबर, क्रेडीट कार्ड नंबर, सी. व्ही. नंबर माहित करून घेऊन आपल्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकते.

- फोन करून विशिष्ट बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलतो असे सांगून आपली संपूर्ण गोपनीय माहिती सांगुन विश्वास संपादन करतात व क्रेडीट कार्ड नंबर, सी. व्ही. नंबर, पिन नंबर विचारून मग त्याद्वारे आर्थिक व्यवहार करतात.

- आपले बॅंक अकौंटं क्रमांक, दूरध्वनी क्र, पारपत्र क्र., पासवर्ड हे ऑन लाईन अथवा फोनद्वारे न सांगणे किवा माहिती न पाठविणे शक्यतो ऑन लाईन बँकिग चा वापर करताना घरच्या किवा खात्रीच्या संगणकाचा वापर करावा तसेच पिन नंबर, पासवर्ड, सी. व्ही. नंबरसाठी व्हरचुअल कि बोर्डचा वापर करवा.
-
प्राप्त ईमेल संदेशामध्ये दिलेल्या कोणत्याही अकौंट मध्ये पैसे नभरणे.
-
ज्यांनी चुकून पैसे भरले असतील त्यांनी सर्व ईमेल सांभळून ठेवावे डिलीट करू नये.

- इंग्लंडची लॉटरी लागली असल्याचे भासविले असल्यास www.gmblingcommission.gov.uk, कंपनीच्या खरे पणाबद्दल खात्री करण्यासाठी www.companieshouse.gov.uk, कंपनीचा पत्ता बघण्यासाठी www.upmysreet.com.uk या वेबसाईटला भेटी द्याव्यात.

- कोणत्याही कारणाने परकीय चलनाने पैसे न पाठवणे जर परदेशी पैसे पाठवले तर पैसे पाठविण्यावर FEMA (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) नुसार RBI guideline अनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारे परकीय चलनामध्ये रक्कम भारताबाहेर पाठवणे हे प्रतिबंधित आहे.
-
कोणत्याही ईमेल मधील लिंकला क्लिक करून कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नये. वेबसाईट उघडताना अॅड्रेसबार वर टाइप करूनच वेबसाईट उघडावी.

- CREDIT CARD/ATM-CUM-DEBIT CARD चा वापर विश्वासपात्र असलेल्या दुकानावरच करावा. आपल्या समोर क्रेडीट कार्ड स्वॅप करून परत घ्यावे त्यावरील नंबर कोणीही नोंदवून घेणार नाही अथवा त्याची झेरोक्स काढणार नाही याची खात्री करावी.

- ATM-CUM-DEBIT CARD वर पिन नंबर लिहू नये व्यवहार झाल्यानंतर परत कार्ड घेण्यास विसरू नये तसेच CREDIT CARD/ATM-CUM-DEBIT CARD हरवील्यानंतर त्वरित संबंधित बँकेस कळवून सदर कार्ड ब्लॉक करावे

इंटरनेट चे गुलाम


इंटरनेटचे गुलाम    लहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? )  पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा   जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट  वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.

१८ वर्ष वय असे पर्यंत मुलाचे गुगल मधे किंवा याहू मधे अकाउंट उघडता येत नाही. मग आई वडीलच स्वतः खोटं वय घालुन  मुलाचा इ मेल अकाउंट उघडुन देतात बरेचदा. या खोटे पणाची काही आवश्यकता आहे का?  मुलांना नेट वर जाउ द्यायचं, इ मेल अकाउंट उघडून द्यायचे – मग मुलाने सगळ्यांसमोर आपला इ मेल पत्ता दिला की कौतुकाने त्याची पाठ थोपटायची- आमचा ’बाळू’ किनाई खुपच फास्ट आहे, त्याला इंटरनेट सगळं कळतं.. असंही म्हणणारे पालक मला भेटले आहेत.

IPv 6.0


1 आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) एड्रेस म्हणजे नक्की काय?
   आपण १९८२ पासून जगभर ही अंक ओळख वापरतोय. आयपी एड्रेसची साधी सरळ सोपी व्याख्या म्हणजे -                       वर्ल्ड वाईड वेब (इंटरनेट) वर तुमच्या संगणकाची असलेली सांकेतिक ओळख अंकांच्या स्वरुपात. हे अंक तुमच्या संगणकाला जागतिक नेटवर्कशी (डिजीटल स्वरुपात) जोडण्यास आणि माहिती आदानप्रदान करण्यात उपयुक्त ठरतात.

 2 आयपी एड्रेस व्हर्जन ४.० नक्की कसा असतो?
आपण सध्या जे आयपी एड्रेस व्हर्जन वापरतो ते आहेत IPv4. ह्या आयपी एड्रेसमध्ये चार क्रमांक असतात, जे प्रत्येकी तीन अंकी असतात. हा साधारणपणे XXX.XXX.XXX.XXX असा असतो (उदारणार्थ १७२.८.९.०). ह्यात "X" च्या जागी ० ते २५५ ह्या मधले कुठलेही अंक असू शकतात. ह्यामध्ये प्रत्येक तीन अंकी क्रमांक ८ बीट्सचे असतात. बीट्स हे एक मापक आहे संगणक गणिती प्रणालीचे, ज्यात प्रत्येक अंक त्या उपकरणात डीजीटली किती माहिती साठवलेली आहे त्याची जागा दर्शवितो. त्यानुसार आयपी व्हर्जन ४.० मध्ये ८+८+८+८=३२ बीट्स आहेत.

3 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची गरज ती काय?
वर दिलेल्या माहितीनुसार ३२ बीट्सचा असलेला आयपी एड्रेस व्हर्जन ४.० आपल्याला ४,२९४,९६७,२९६ इतके पब्लिक एड्रेस देऊ शकणार होता. आता इतक्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे साहजिकच जितके कॉम्बिनेशन्स आपण वापरू शकत होतो ते संपू लागलेत आणि तेव्हाच इंटरनेटच्या पुढच्या पिढीची म्हणजेच आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची सन १९९५ मध्ये निर्मीती करण्यात आली.

4 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कसा असतो आणि याचे फायदे काय?
इंटरनेटची पुढची पिढी व्हर्जन ६.० खुप संशोधनातून तयार केली गेली आहे. व्हर्जन ४.० च्या तुलनेत व्हर्जन ६.० मध्ये १२८ बीट्सची क्षमता आहे. हे तयार करताना मागील व्हर्जनमधल्या तीन अंक स्वरुपात बदल करून तो चार अंकी करण्यात आला आणि चार क्रमांक वाढवून ८ करण्यात आले. म्हणजेच चारपट जास्त आयपी एड्रेस आपल्याला मिळतील . हा साधारपणे XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX अश्या फॉर्ममध्ये दिसेल (उदाहरणार्थ - 3ffe:1900:4545:3:200:f8ff:fe21:67cf). ह्यामध्ये प्रत्येक चार अंकी क्रमांक हा १६ बिट्सचा असणार (अंक आणि अक्षर असल्याने) आहे. त्यामुळे १६+१६+१६+१६+१६+१६+१६+१६=१२८ बिट्स. आपणास फरक जाणवेल की जुन्या व्हर्जनमध्ये दोन अंकांच्यामध्ये डॉट (.) होता आणि इथे कोलन् ( : ) आहे. ह्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण केलेला बदल म्हणजे, ह्या आयपी एड्रेसमध्ये अक्षरसुद्धा असतील अंकांबरोबर A to F पर्यंत. ह्या प्रकारच्या आयपी एड्रेसमुळे जगभर नवीन ३४०,२८२, ३६६,९२०, ९३८,४६३,४६३,३७४,६०७,४३१,७६८,२२१,४५६ इतके युनिक आयपी एड्रेस जगभर उपलब्ध होतील.
  हास्य
 5 आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कधी पासून उपलब्ध होईल?


ह्या वर्ष अखेरीस जगभर व्हर्जन ६.० वापरायला सुरुवात होईल. अमेरिकेत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोन शहरात आमच्या कंपनीने व्हर्जन ६.० देण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती. सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता, पण मग सगळ सुरळीत झालं. आपल्या भारतातसुद्धा फेब्रुवारीपासून हे काम सुरु झालंय.

हे वापरण्यासाठी आपल्याला बदल करावे लागतील का?
हे व्हर्जन वापरण्यासाठी आपल्याला हार्डवेअरमध्ये काहीही बदल करावे लागणार नाहीत एक मोडेम रिसेट सोडून (काही ठिकाणी राऊटर रि-कॉन्फिगर करावे लागतील इतकंच). जर तुम्ही डायनामिक आयपी एड्रेस वापरत असाल तर तो आपोआप बदलला जाईल, आणि जर स्टॅटिक आयपी असेल तर आपल्याला मॅन्यूअली बदलावा लागेल.
ह्याचे फायदे ते काय?
१. खुप मोठ्या प्रमाणावर युनिक एड्रेस मिळणे.
२. नेटवर्क अजून जास्त सुरक्षित होईल.
३. डीएनएस (DNS - Domain Name System) जी संकेतस्थळ उघडण्यासाठी वापरली जाते ती प्रक्रिया थोडी जलद होईल.
काही तोटे -
१. हा आयपी लक्षात ठेवायाला कठीण आहे.
२. लगेच मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल काहीसा त्रासदायक ठरू शकतो इनस्टॉल करताना सर्वीस ऑपरेटर्सना चलो लेट्स होप फॉर द बेस्ट......