कॉम्प्युटर हाताळताना अचानक व्हायरस येण्याची नेहमी शक्यता असते. हा व्हायरस कॉम्प्यूटरमध्ये सुरक्षित केलेल्या फाइल्स करप्ट करतो. त्यामुळे आपल्या कॉम्प्युटरला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कॉम्प्युटरवर प्रोग्राम बनविलेला असतो. यामध्ये जावा, सी लँग्वेज, एक्सेल, डॉट नेट इत्यादी प्रोग्राम्स असतात. या प्रोग्राममध्ये सूचनांचा संच असतो. ( उदाहरणार्थ दुकानदाराचे बिल बुक छापणे, ग्रीटींग कार्ड इत्यादी.) अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये काही जण व्हायरस सोडतात.
व्हायरस सोडणार्या लोकांना कॉम्प्युटरची सखोल माहिती असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रोग्रामवर हल्ला करायचा हे लोकांना निश्चित करता येते. व्हायरसमुळे तयार असलेल्या फाइल्स एकापाठोपाठ नष्ट होऊ लागतात.
व्हायरसचे प्रकारव्हायरसचा पहिला प्रकार म्हणजे 'कम्पॅनियन व्हायरस'. हा व्हायरस चांगल्या प्रोग्रामला खराब करत नाही. त्यामुळे प्रोग्राम सुरक्षित राहतो. परंतु, दुसरा व्हायरस एखाद्या चांगल्या प्रोग्राममध्ये बिघाड करतो. उदा. आपण 'विंडोज' मध्ये एखाद्या प्रोग्रॅमच्या नावावर किंवा आयकॉनवर डबल क्लिक केलं तर आपल्याला हवा असणारा मूळ प्रोग्रॅम सुरू होण्याऐवजी हा व्हायरसचा प्रोग्रॅमच नकळत सुरू होतो आणि त्याचा कार्यभाग उरकून मूळ प्रोग्रॅमकडे पुन्हा सूत्र देऊन टाकतो.
व्हायरसचा दुसरा प्रकार म्हणजे 'एक्झिक्युटेबल प्रोग्रॅम व्हायरस'. हा व्हायरस प्रोग्रामला सर्वात जास्त धोकादायक असतो. तो आपल्या कॉम्प्युटरच्या डिस्कवरील सर्व 'डिरेक्टरीज' सलग वाचत राहतो. प्रत्येक डिरेक्टरीत त्याला जी एक्झिक्युटेबल (म्हणजे आपण तिच्या नावावर डबल क्लिक केलं की तिचं काम सुरू होतं अशी ) फाइल दिसेल अशा प्रत्येक फाइलमध्ये प्रवेश करण्याचं तो मुख्य काम करतो. हा व्हायरस मूळ एक्झिक्युटेबल फाइल पूर्णपणे नष्ट करून टकातो.
तिसर्या प्रकारचा व्हायरस म्हणजे 'मेमरी रेसिडेंट व्हायरस'. या व्हायरसने एकदा आपल्या कॉम्प्यूटरमध्ये प्रवेश केल्यास तो नेहमी जागृतावस्थेत असतो म्हणून त्याला 'मेमरी रेसिडेंट' व्हायरस असे म्हणतात. पहिल्या दोन प्रकारातील व्हायरस डिस्कवरच्या फाइल्स आणि प्रोग्रॅम्सवर हल्ला करत असतो. जेव्हा आपण त्या फाइल्स उघडायला जाऊ तेव्हा तो व्हायरस जागृत होऊन आपलं काम साधतो.
पण 'मेमरी रेसिडंट व्हायरस' मात्र सदैव आपल्या कृतींचा कानोसा घेऊन त्यांच्यापैकी काहींचा स्वत: कडे ताबा घेतो. उदा. आपल्या की बोर्डवरची कळ दाबली की अक्षर पडद्यावर उमटायला पाहिजे पण की कीबोर्डशी संबंधित 'मेमरी रेसिडेंट व्हायरस' आपल्या कॉम्प्युटरमध्ये घुसला तर तो कीबोर्डचं नियंत्रण स्वत: कडे घेतो आणि ते अक्षर पडद्यावर उमटण्याऐवजी दुसरचं काहीतरी करेल.
......
कम्प्युटर व्हायरसचं काम चालतं कसं?
व्हायरस लिहिणा - या लोकांना कम्प्युटर कसा चालतो याची बरीच सखोल माहिती असावी लागते . कारण त्यातूनच कम्प्युटरमधल्या कुठल्या बाबींवर हल्ला करता येईल , हे ठरवता येतं . व्हायरसचं मुख्य उद्दिष्ट हे दुस - या , आधी व्यवस्थित चालणा - या ' निष्पाप ' प्रोग्रॅमला बिघडवून त्याच्याकडून चित्रविचित्र प्रकार घडवून घेणं हे असतं
कम्प्युटरकडून अनेक प्रकारची कामं करून घेण्यासाठी प्रोग्रॅमर मंडळी जावा , सीशार्प , वगैरे भाषांमध्ये ' प्रोग्रॅम्स ' लिहीत असतात . एखादा प्रोग्रॅम म्हणजे सूचनांचा संच . सर्वसामान्यत : असे प्रोग्रॅम्स लिहिण्यामागचा मंडळींचा हेतू विधायक असतो . ( उदाहरणार्थ पगारपत्रिका तयार करणं , बिलं छापणं वगैरे .) पण तंत्रज्ञानाचा वापर विध्वंसक वृत्तीनं करणारी काही मंडळी सर्वत्र असतातच . अशी प्रोग्रॅमर मंडळी व्हायरसेसचे प्रोग्रॅम्स लिहितात .
व्हायरस लिहिणा - या लोकांना कम्प्युटर कसा चालतो याची बरीच सखोल माहिती असावी लागते . कारण त्यातूनच कम्प्युटरमधल्या कुठल्या बाबींवर हल्ला करता येईल , हे ठरवता येतं . व्हायरसचं मुख्य उद्दिष्ट हे दुस - या , आधी व्यवस्थित चालणा - या ' निष्पाप ' प्रोग्रॅमला बिघडवून त्याच्याकडून चित्रविचित्र प्रकार घडवून घेणं हे असतं . म्हणजे व्यवस्थितपणे पगारपत्रिका तयार करणारा एखादा प्रोग्रॅम अचानकपणे व्हायरसच्या हल्ल्यानंतर फाइल्स डिलिट करू लागतो , वगैरे . तर हल्लेखोर त्यासाठी आधी आपल्या कम्प्युटरवरच्या एखाद्या व्यवस्थित चालणा - या प्रोग्रॅममध्ये व्हायरसचा प्रोग्रॅम घुसवून टाकतो . हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ .
समजा आपल्या पगारपत्रिका तयार करण्याच्या प्रोग्रॅममधल्या पहिल्या तीन सूचना अशा आहेत :
पगाराविषयीची माहिती साठवलेली फाइल उघड .
प्रत्येक कर्मचा - याचं रेकॉर्ड वाच .
त्या कर्मचा - याचा एकूण पगार खालील गणितांनी ठरव , वगैरे .
यानंतर प्रत्यक्ष आकडेमोडी , पगारपत्रिका छापणं , इत्यादिसाठीच्या सूचना या प्रोग्रॅममध्ये असतील . आता समजा हल्लेखोरानं या प्रोग्रॅमचं काम बिघडवायचं ठरवलं , तर काय होईल ? तो कदाचित आपल्या मुळच्या प्रोग्रॅमच्या दुस - या सूचनेत बदल करून तिला प्रत्येक कर्मचा - याचं रेकॉर्ड वाचण्याऐवजी व्हायरस ( प्रोग्रॅम ) मधल्या सूचना आधी अंमलात आणायला सांगेल . त्या व्हायरसमधल्या लिहिलेल्या गोष्टी मग घडू लागतील . उदाहरणार्थ , डिस्कवरच्या फाइल्स उडवणं किंवा किंवा कम्प्युटरच्या पडद्यावर चित्रविचित्र आकृत्या नाचवणं वगैरे . मग हा धुडगूस घालून झाला की व्हायरस पुन्हा आपल्या मुळच्या प्रोग्रॅममधल्या मुळच्या सूचनेकडे नियंत्रण देऊन टाकेल . आणि कदाचित पगारपत्रिका व्यवस्थित छापल्या जातीलही !
आता एखादा चांगला प्रोग्रॅम व्हायरसनं बिघडवून टाकला की तो प्रोग्रॅम ई - मेलनं दुस - या अनेक कम्प्युटर्सवर पोहोचतो . कधी तो हल्लेखोरानं जाणूनबुजून फॉरवर्ड केलेला असतो . तर कधी व्हायरसच ई - मेल्सच्या माध्यमातून स्वत : ला पसरवू शकतो .
व्हायरसेसचे अनेक प्रकार असतात . त्यांच्यामधला पहिला म्हणजे ' कम्पॅनियन व्हायरस '. हा खरं म्हणजे चांगल्या प्रोग्रॅम्सना हात लावत नाही . त्यामुळे चांगल्या प्रोग्रॅम्समध्ये बिघाड होणं वगैरे प्रकार इथं घडत नाहीत . पण त्याऐवजी हा व्हायरस दुस - या एखाद्या चांगल्या प्रोग्रॅम्सच्या ठिकाणी स्वत : च आपलं घोडं दामटतो . ते कसं ? तर जेव्हा आपण ' विंडोज ' मध्ये एखाद्या प्रोग्रॅमच्या नावावर किंवा आयकॉनवर डबलक्लिक केलं तर आपल्याला हवा असणारा मूळ प्रोग्रॅम सुरू होण्याऐवजी हा व्हायरसचा प्रोग्रॅमच आपल्या नकळत सुरू होतो आणि त्याचा कार्यभाग उरकून मूळ प्रोग्रॅमकडे पुन्हा सूत्र देऊन टाकतो .
व्हायरसेसचा दुसरा प्रकार म्हणजे ' एक्झिक्युटेबल प्रोग्रॅम व्हायरस '. या प्रकारातला प्रोग्रॅम जास्त घातक असतो . तो आपल्या कम्प्युटरच्या डिस्कवरच्या सगळ्या ' डिरेक्टरीज ' एकापाठोपाठ एक वाचत सुटतो . प्रत्येक डिरेक्टरीत त्याला जी जी एक्झिक्युटेबल ( म्हणजे आपण तिच्या नावावर डबलक्लिक केलं की तिचं काम सुरू होतं अशी ) फाइल दिसेल अशा प्रत्येक फाइलमध्ये घुसणं हे त्याचं मुख्य काम असतं . हा व्हायरस चक्क मूळ एक्झिक्युटेबल फाइल पूर्णपणे पुसून त्याठिकाणी आपला प्रोग्रॅम लिहिण्यापासून तसं न करता त्याच्यामध्ये कुठूनतरी आपल्याकडे नियंत्रण मिळवणं आणि नंतर परत मूळ प्रोग्रॅमकडे सूत्र देणं असे अनेक प्रकार करू शकतो .
तिस - या प्रकारचा व्हायरस म्हणजे ' मेमरी रेसिडेंट व्हायरस '. या प्रकारचा व्हायरस हा एकदा का आपल्या कम्प्युटरमध्ये घुसला की सदैव जागृतावस्थेतच असतो म्हणून त्याला ' मेमरी रेसिडेंट ' किंवा कम्प्युटरच्या मेमरीत राहणारा व्हायरस असे म्हणतात . आधीच्या दोन प्रकारांमधले व्हायरस डिस्कवरच्या फाइल्स आणि प्रोग्रॅम्सवर हल्ला चढवत असल्यानं जेव्हा आपण त्या फाइल्स उघडायला जाऊ तेव्हा तो व्हायरस जागृत होऊन आपलं काम साधतो . पण ' मेमरी रेसिडंट व्हायरस ' मात्र सदैव आपल्या कृतींचा कानोसा घेऊन त्यांच्यापैकी काहींचा स्वत : कडेच ताबा घेतो . उदाहरणार्थ आपल्या कीबोर्डवरची की दाबली की खरं म्हणजे ते अक्षर पडद्यावर उमटलं पाहिजे . पण जर कीबोर्डशी संबंधित ' मेमरी रेसिडेंट व्हायरस ' आपल्या कम्प्युटरमध्ये घुसला तर तो कीबोर्डचं नियंत्रण स्वत : कडे घेईल आणि ते अक्षर पडद्यावर उमटण्याऐवजी भलतंच काहीतरी करेल . उदाहरणार्थ ते अक्षर पडद्यावरून खाली पडल्यासारखं घरंगळवणं वगैरे !
चौथा प्रकार म्हणजे ' बूट सेक्टर व्हायरस '. आपण जेव्हा आपला कम्प्युटर सुरू करतो तेव्हा बायॉस नावाची यंत्रणा पहिल्यांदा जागी होते . ही यंत्रणा डिस्कवरून कम्प्युटरच चालू केल्यावर ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ( उदाहरणार्थ कीबोर्ड - माऊस जोडले आहेत की नाहीत , मेमरी ठीकठाक आहे की नाही ) त्या तपासून डिस्कवरून आपल्या कम्प्युटरची विंडोज , लिनक्स वगैरे ' ऑपरेटिंग सिस्टिम ' मेमरीत आणते . मग आपली ऑपरेटिंग सिस्टिम आपल्या कम्प्युटरचा ताबा घेऊन त्याचं काम चालवते . जेव्हा ' बूट सेक्टर ' व्हायरस आपल्या कम्प्युटरवर हल्ला करतो तेव्हा ' बायॉस ' नं ऑपरेटिंग सिस्टिमकडे नियंत्रण सोपवण्यापूर्वीच हा व्हायरस आपल्या कम्प्युटरवर कब्जा घेऊन टाकतो . मग तिथून पुढे काय करायचं हे तो व्हायरस ठरवतो !
' मॅक्रो व्हायरस ' हा मायक्रोसॉफ्ट वर्ड , एक्सेल इत्यादि प्रकारच्या फाइल्समधून पसरतो .
जी मंडळी ' अॅण्टिव्हायरस ' लिहितात त्यांचं काम डॉक्टर्ससारखं चालतं . डॉक्टर्स कसे आपल्याला होणा - या त्रासाविषयी अनेक प्रश्न विचारतात , चाचण्या करून रक्त वगैरे तपासतात . आणि या सा - यातून आपल्या शरीरात झालेल्या बिघाडामागे कोणता ठराविक ' पॅटर्न ' आहे का ते शोधतात ! तसंच प्रत्येक व्हायरसचा ' पॅटर्न ' ( त्याला त्याची ' सिग्नेचर ' म्हणतात ) असतो . ही ' सिग्नेचर ' म्हणजे चक्क ० - १ च्या भाषेतल्या व्हायरसच्या सूचना . अशा लाखो सिग्नेचर्स ओळखून त्या व्हायरसेसना दूर ठेवणं , सा - या प्रोग्रॅम्सवर बारीक लक्ष ठेवून कुठल्या प्रोग्रॅमचं काम व्हायरससारखं तर नाहीये ना हे सतत करत राहणं , ही ' अॅण्टिव्हायरस ' सॉफ्टवेअरची जबाबदारी
No comments:
Post a Comment