Friday, 23 September 2011
बिल गेटस्चे असेही रेकॉर्ड !
बोस्टन: मायक्रोसॉप्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस् यांनी अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत यादीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविले असून त्यांनी सलग १७ वर्षे आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. गेटस यांच्याकडे ५४ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. फोब्र्सने नुकतीच अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत ४०० लोकांची यादी जाहीर केली. त्यानुसार गेटस् प्रथम तर उद्योगपती बर्कशायर हाथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॅरेन बॉफेट यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यांच्याकडे ४५ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. तिस-या क्रमांकावर सॉप्टवेअर कंपनी ओरॅकलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी इलिसन यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय या यादीत फेसबुकचा मालक मार्क जुकेरबर्ग ३५ व्या स्थानावर आहे. त्याच्याकडे सुमारे ७ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. अॅपलचे मालक स्टीव जॉब्स ४२ व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ६.१ बिलियन डॉलरची संपत्ती आहे. मीडिया बादशाह ऑरफा विनफ्रे १३०व्या स्थानावर आहे.त्यांच्याकडे २.७ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment