टरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. आपल्या सर्वांच्याच उपयोगी पडणारी...
.
1) आपल्याला एखादी फाइल डाऊनलोड करायची असते पण ती डाऊनलोड व्हायला इतका वेळ लागतो की वैताग येतो. प्रत्येकाकडे ब्रॉडबँड असेलच असे नाही, त्यामुळे जे काही इंटरनेट कनेक्शन असेल त्याच्याशी झटापट करावी लागते. हे डाऊनलोडिंग चालू असताना दुसरे काही काम करता येत नाही. मध्येच वीज गेली वा कम्प्युटर हँग झाला तर पुन्हा सारे डाऊनलोडिंग पहिल्यापासून करावे लागते. अशा वेळेस आपल्या मदतीला येतात वेगळ्या प्रकारचे मॅनेजर्स. त्यांना डाऊनलोड मॅनेजर म्हणतात. फार हौस असेल तर असे 'डाऊनलोड मॅनेजर्स' तुम्ही विकतही घेऊ शकता. पण फुकटातले मॅनेजर्स असतील आणि तेच काम अधिक कार्यक्षमतेने करत असतील तर? विकत घेतलेल्या मॅनेजरमध्ये थोड्या अधिक सुविधा असतात हे खरे, पण फुकट्यांत पुरेशा सोयी असतात हेही खरे.
2) इंटरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. 'डाऊनलोड अॅक्सलरेटर प्लस'ची ८.६ क्रमांकाची व्हर्जन सध्या उपलब्ध आहे. कोणतेही डाऊनलोड अत्यंत वेगाने करणारा मॅनेजर म्हणून त्याला ओळखले जाते. कोणत्याही कारणाने डाऊनलोडिंग खंडित झाले तर पुन्हा आपोआप सुरू करण्याची क्षमता यात आहे. म्हणजे आधी एखाद्या फाइलचा जेवढा भाग डाऊनलोड झाला असेल त्याच्यापुढचा भाग डाऊनलोड होत राहातो. हा मॅनेजर वेगवान असला तरी अन्य साइटवर जाऊन त्याहीपेक्षा अधिक वेगाने डाऊनलोड करायचे असेल तर पर्यायी साइट सुचविण्याचेही काम केले जाते. हा फुकटात मिळत असला तरी तो अपग्रेड करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते मोजायचे नसतील तर 'डाऊनलोड अॅक्सलरेटर मॅनेजर ३.२' डाऊनलोड करा. त्यातही 'प्लस'ची बरीच वैशिष्ट्ये आहेत.
'3) फ्लॅशगेट' या डाऊनलोड मॅनेजरची लोकप्रियता या अॅक्सलरेटरएवढीच आहे. त्याची व्हर्जन १.९.६ सध्या चालू आहे. तेथे वेगाने फाइल डाऊनलोड होतेच, पण डाऊनलोड झालेल्या फाइलमध्ये व्हायरस नाही ना हे पाहण्याचे काम हा मॅनेजर लगेचच करतो. म्हणजे व्हायरसयुक्त फाइल मशीनमध्ये जाऊच शकत नाही. 'फ्लॅशगेट' डाऊनलोड केल्यावर डेस्कटॉपवर उजव्या बाजूला त्याचा एक आयकॉन येतो. 'ऑबिर्ट डाऊनलोडर' हाही एक अत्यंत उपयुक्त मॅनेजर आहे. म्युझिक, व्हीडिओ, मीडिया फाइल्स वेगाने डाऊनलोड करण्याचे काम तो करतो. शिवाय इंटरनेट एक्सप्लोअरर, फायरफॉक्स, मॅक्सथॉन, ऑपेरा या सर्व ब्राऊझरमध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करतो. कोणत्याही कारणाने खंडित झालेले डाऊनलोडिंग पुन्हा पुढे सुरू करण्यात त्याचा हातखंडा आहे.
4) याशिवाय, 'फ्री डाऊनलोड मॅनेजर (व्हर्जन २.५.७५८), 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' (५.१४.३), फ्रेश डाऊनलोड (८.०२) असे काही चांगले डाऊनलोड मॅनेजर आहेत. यापैकी 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' हा फ्लॅश व्हीडिओ, यूट्यूबवरचे व्हीडिओ, गूगल व्हीडिओ वगैरे डाऊनलोड करायला उपयोगी पडतो. प्रत्येकाने आपापल्या मशीनच्या क्षमतेनुसार आणि इंटरनेटच्या प्रकारानुसार मॅनेजर डाऊनलोड करावा. मॅनेजर कोणताही असला तरी फाइल त्यात थेट सामावल्या जातात. त्यावर डबल क्लिक करून ती फाइल ओपन करता येते वा इएक्सइ फाइल म्हणजे एखादे अॅप्लिकेशन असले तर तो प्रोग्राम थेट डाऊनलोड होणे सुरू होते. प्रोग्राम डाऊनलोड झाल्यावरही ती अॅप्लिकेशन फाइल तेथेच राहात असल्याने पुन्हा कधी काही कारणाने तो प्रोग्राम चालवायचा झाला तर बरे पडते.
5) मास डाऊनलोडर (व्हर्जन ३.४.७) हा उत्तम डाऊनलोडर-पैकी एक ओळखला जातो. एखादी झिप फाइल डाऊनलोड करायची असेल तर तिच्यातल्या फाइल्स पाहण्याची संधी डाऊनलोड करण्याआधी आपल्याला मिळते हे याचे वैशिष्ट्य. एका वेळेस शंभर वेगवेगळ्या फाइल्स डाऊनलोड करता येतात. म्हणून त्याला 'मास' डाऊनलोडर म्हणतात. 'गेटराइट ६.३डी' हा आणखी एक डाऊनलोडर आहे. पण तो ३० दिवस फुकटात वापरता येतो. नंतर त्याचे लायसन्स विकत घ्यावे लागते. फाइल डाऊनलोड करताना अडथळा आला अथवा इंटरनेट कनेक्शन तुटले तरी नंतर ती फाइल व्यवस्थित डाऊनलोड करता येते. हा डाऊनलोडर दिसायला साधा आहे आणि त्याची फीचर्स आपल्याला हव्या त्या पद्धतीने सेट करता येतात. तरीही केवळ ३० दिवसांसाठी तो स्वीकारावा का हा प्रश्ान् उरतोच.