आज ब्लुटुथ तंत्रज्ञान वेळोवेळी आपण वापरतो. मोबाईलच्या तसेच संगणकाच्या सहयोगी वस्तुंमधे तर या तंत्रज्ञानाने क्रांती घडवुन आणली आहे.
ब्लुटुथ तंत्रज्ञान हे संगब्लुटुथ हे नाव विसाव्या शतकातील राजा हेराल्ड ब्लाटांड याच्या आडनावाच्या इंग्रजी भाषेतल्या सुसुत्रीकरणातुन आले आहे. त्याने युरोपातल्या अनेक टोळ्यांचे एकत्रीकरण करुन एकच साम्राज्य उभे केले होते. ब्लुटुथ तंत्रज्ञाने अगदी हेच केले आहे, वेगवेगळ्या कम्युनिकेशन मानकांना एकत्र करुन एक जागतिक दर्जाचे मानक बनवले आहे.
ब्लुटुथ तंत्रज्ञान फ्रिक्वेन्सी हॉपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम नावाचे रेडिओ तंत्रज्ञान/मानक वापरते. हे तंत्रज्ञान वापरुन होणार्या माहिती प्रसारणाचा वेग कमाल १ मेगाबाईट प्रतिसेकंदापर्यंत असु शकतो. माहिती प्रसारणाचे अंतर किमान १ मीटर पासुन ते कमाल १०० मीटर पर्यंत असु शकते. हे तंत्रज्ञान प्रसारणार रेडिओ लहरींचा वापर करत असल्याने याचे वापरकर्ते एका रेषेतच असणे गरजेचे नाही.
ब्लुटुथच्या मायक्रोवेव्ह रेडिओ लहरींची मर्यादा 2.4 GHz ते 2.4835 GHz इतकी आहे. ही सर्वसाधारण मोबाईलफोन पेक्षा कमी आहे. त्यामुळे शरीराला होणार्या अपायांच्या तुलनेत ब्लुटुथ हे मोबाईल पेक्षा जास्त सुरक्षित आहे.
मोबाईलवर ब्लुटुथ वापरतांना सुरक्षेसाठी खालील गोष्टींचे पालन व्हावे.
१. ब्लुटुथ जेव्हा लागेल तेव्हाच चालु करा. वापर झाल्यावर ते आठवणीने बंद करा.२. ब्लुटुथ नेहमी नॉनडिस्कव्हरेबल म्हणजे हिडन मोड मधे ठेवा.
३. ब्लुटुथ उपकरणांची कायमची जोडणी (पेअरिंग) करतांना वापरण्यात येणारा पिन हा पुरेसा लांब आणी अल्फान्युमरीक असावा.
४. अनोळखी जोडणीच्या विनंत्या अॅक्सेप्ट करु नका.
५.जोडणीची यादी वारंवार तपासुन पहा, एखादी अनोळखी जोडणी सापडल्यात ती काढुन टाका.
६. संगणकाशी जोडणी करतांना एन्क्रिप्शनचा ऑप्शन चालु ठेवाणकाधारीत उपकरणांमधले माहितीवहनाचे अत्याधुनिक आणी वैश्विक असे मानक आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने संगणकाधारीत वस्तुंच्या सहयोगी वस्तुंमधील केबलच्या जंजाळापासुन मुक्तता झाली आहे. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ते सर्वसामान्यांच्या आवक्यापर्यंत येण्याइतके स्वस्तही होत आहे. याचा वीज वापरही अत्यल्प असतो, त्यामुळे मोबाईलसारख्या वस्तुंमधेही हे अत्यंत उपयोगी ठरले आहे. दोन मोबाईलमधे तात्पुरते नेटवर्क तयार करुन माहीती पाठवणे, अथवा ब्लुटुथ हेडफोनने संगीत ऐकणे ह्या अगदी रोजच्या वापरातील गोष्टी झाल्या आहेत. तुमच्या संगणकाशीही ब्लुटुथद्वारे तुमचा मोबाईल सिंक्रोनाईझ होउ शकतो, जेणेकरुन तुमच्या मोबाईलवरील सर्व गोष्टींचा बॅकअप सारखा घेतला जात जाईल आणी तुमचा वैयक्तीक डेटा सुरक्षीत राहील.
No comments:
Post a Comment