Saturday, 7 January 2012

खराब झालेल्या CD मधुन माहीती कशी घेणार


परवा साफसफाई करताना अडगळीत एक CD सापडली ती अलीबाबाच्या काळातली वाटली मला. कारण त्याच्यावर बर्‍यापैकी ओरखडे (Scratches) पडले होते. ती CD माझीच होती हे नक्की. पण  त्यात काय होते हे नव्हते माहीत मला . त्या CD ची हालत बघुन वाटत होते आता यातली माहीती Copy कशी करायची, कारण ओरखडे असलेल्या CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे महाकठीण काम असते. त्यात जर Audio किंवा Video या प्रकारची १ च फाईल असेल तर ती ह्या जन्मी तरी कॉपी होणार नाही याची खात्री असते. मनात विचार आला की आपल्याला असे एखादे सोफ्टवेअर मिळाले तर की ज्याद्वारे शक्य तितकी माहीती तरी घेणे शक्य होईल, मग काय लागलो कामाला आणि भ्रमंती सुरु झाली माझी Internet वर. थोड्याच वेळात एक मस्त, चकटफू आणि व्हायरस नसलेले असे सोफ्टवेअर माझ्या हाती लागले त्याचे नाव आहे Bad CD DVD Reader. हे सोफ्टवेअर हातळण्यास अगदि सोपे आहे तसेच या सोफ्टवेअरची Installation Process देखील सहज सोपी अशी आहे. खालील लिंकवर क्लिक करून या सोफ्टवेअरची setup फाईल डाऊनलोड करुन घ्या.
तुम्ही डाऊनलोड केलेल्या setup फाईलवर डबल क्लिक करा.


मुळ Installation ची प्रक्रिया सुरु होईल ती खालील प्रमाणे असेल.
१.

२.

३.

४.

५.


६.

७.

८.

९.

 Finish या बटणावर क्लिक केल्यावर. हे सोफ्टवेअर तुमच्या काँप्युटरवर Install होईल आणि आपोआपच सुरु होईल.
मला सापडलेली ती CD मी माझ्या CD Drive मध्ये आधीच टाकून ठेवली होती.त्यामुळेच Bad CD/ DVD Reader सुरु झाल्यावर मला माझ्या CD मधील सर्व फोल्डर्स दिसले आणि ती CD गाण्यांची असल्याचे माझ्या निदर्शनास आले.

.माझ्या CD मधील जास्तीत जास्त माहिती (गाणी) मला हवी होती. त्यामुळे मी कुठलेही फोल्डर न निवडता G Drive निवडला जो माझा Default (मुळ) Drive आहे (तुमचा कुठलाही असू शकतो अगदी E किंवा H सुद्धा). तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या उपयोगाचे आणि अगदी महत्त्वाचे फोल्डर किंवा फाईल निवडू शकता.
तुम्हाला या CD किंवा DVD वरील फाइल्स साठवण्यासाठी सर्वात वर असलेल्या मेन्यु बार माधून Copy a folder हा पर्याय निवडावा लागेल.

हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुमचे निवडलेले फोल्डर साठवण्यासाठीचे ठिकाण (Location) निवडण्याकरिता एक छोटी विंडो दिसेल त्यातून तुम्हाला हव्या त्या फोल्डर मध्ये तुम्ही फाईल्स कॉपी करून ठेवू शकता. मी आधीपासूनच E Drive मध्ये datarecovered नावाचे फोल्डर बनवून ठेवले आहे आणि मी तेच Destination Foldaer म्हणून निवडले आहे. तुम्हाला हवे असल्यास एखादे नविन फोल्डर देखील तुम्ही Create new folder या बटणावर क्लिक करून बनवू शकता.
एकदा तुम्ही Destination Folder निवडले की तुम्हाला Copy या बटणावर क्लिक करयचे आहे.

Copy या बटणावर क्लिक केल्यावर काँप्युटर सर्व शक्तीनिशी जितकी माहिती वाचतायेण्याजोगी (Readable) आहे आणि करप्ट नाही अशी माहिती तुम्ही निवडलेल्या फोल्डर मध्ये कॉपी होईल.(Stop बटणावर क्लिक करू नका त्यने तुमची Data Copying ची प्रक्रिया थांबेल, हा जर तुम्हाला स्वतःला ही प्रक्रिया जर थांबवायची असेल तर मात्र नक्की stop बटणावर क्लिक करा )

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो. त्यामुळे जर जास्त Scratches तर मग हा पर्याय काय इतर कुठलाही पर्याय न वापरलेलाच बरा.उगीच विशाची परीक्षा कशाला घ्या म्हणतो मी..
पण तुर्तास हे सोफ्टवेअर वापरुन निदान काहीतरी माहिती आपल्याला मिळवता येत असेल तर हे सोफ्टवेअर नक्की वापरून बघा. आणि सांगा तुम्हाला किती वेळ लागला खराब CD/ DVD मधून Data कॉपी करायला!!! माझी CD कॉपी व्हायला १५ मिनिटे लागली आणि जवळ जवळ सगळीच गाणी कॉपी झाली.

No comments:

Post a Comment