Wednesday, 22 February 2012

संगणकात सीडी टाकली की ती स्वत:हून सुरू होते.

स्वत:हून सीडी सुरू होण्याच्या सुविधेला ऑटो रन म्हणतात. ही सुविधा काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक तात्पुरता मार्ग ज्यात सीडी ड्राइव्हमध्ये टाकल्यावर ताबडतोबशिफ्ट हे बटन दाबून ठेवा. सीडी ड्राहवचा दिवा बंद होइ पर्यंत (संगणकाचे सीडी ड्राइवमधील सीडी वाचून होईपर्यंत ... अगदी काही सेकंद लागतील) दाबून ठेवा. पण हा उपाय फक्त त्या वेळेसाठी असेल पुढच्या वेळी परत सीडी टाकल्यावर ती स्व:तहून सुरू होईल.
 
जर आपलाला कायमची ही सुविधा काढायची असेल तर दुसरा उपाय म्हणजे स्टार्ट -सेटिंग - कन्ट्रोल पॅनल - सिस्टम - डिवाइस मॅनेजर निवडा. यात आपला सीडी रॉम डिवाइस निवडा आणि त्याच्या प्रॉपटीर्ज् वर क्लिक करा. या नंतर 'सेटिंग या टॅबवर क्लिक करा आणि ऑटो इन्सर्ट नोटिफिकेशन या ऑप्शन जवळ असलेले बरोबर चिन्ह क्लिक करून काढा. 

No comments:

Post a Comment