Monday, 30 April 2012

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची


१. http://www.jacksonpollock.org/

रंगाशी खेळणे आवडते तुम्हाला ? तर वरील संकेतस्थळावर जा... माऊस फिरवा... बघा काय होतं ते ... थोड्या वेळाने तुम्ही स्वतःला नक्कीच एक उच्च कोटीचा मॉडर्न आर्टवाला पेंटर समजु लागला.... हा हा हा :)


२. http://www.greeniq.com/ 

आपली धरती / पृथ्वी हिरवीगार असावी असे वाटतं तुम्हाला... तर हे योग्य संकेतस्थळ आहे तुमच्यासाठी... ग्लोबल वॉर्मिंग पासून धरतीचे कसे रक्षण करावे ह्याची संपुर्ण माहीती व संबधीत बातम्या.. संघटना ह्यांचे दुवे !

३. http://www.5min.com/ 
ट्रीक्स !!! एकापेक्षा एक जबरदस्त ट्रीक्स आहेत ह्या संकेतस्थळावर.. बुध्दीबळ, सुन्न्कर, बिल्यर्ड... पियानो, गिटार.. ड्रमसेट... कसे वाजवावे कसे हताळावे ह्यांची दृष्य माहीती येथे उपलब्घ आहे.. तसेच शेयर मार्केट... कोचींग... सेल्समॅन कसे बनावे ह्याची प्रचंड माहीती ह्या संकेतस्थळावर व्हीडीओ माध्यमातून आहे... बेस्ट वेबसाईट !

४. http://www.slacker.com/ 
इंन्टर्नॅशनल गाण्यांसाठी एक जबरदस्त / कमी महाजाल वेगामध्ये देखील व्यव्स्थीत काम करणारे रेडिओ स्टेशन !

५. http://onelook.com/ 
शब्द संग्रह !!! पण असा तसा नाही... एक शब्दाच्या अर्थाबरोबर.. त्याची पुर्ण माहीती देखील ! वापरुन पहा !

६. http://www.bestechvideos.com/
तुम्हाला फोटोशॉप शिकायचे आहे ? तुम्हाला सी++ शिकायचे आहे ? काही ही शिका येथे ऑनलाईन व्हीडीओ द्वारा ! संकलन आहे वेगवेगळ्या विषयातील माहीतीचे एका जागी !
- राजे
http://www।lokayat।com/

Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर











Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्‍याच जणांची समजूत असते. Recycle Bin ही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. 


जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजे Empty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्‍या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं जवळजवळ अशक्य असतं

Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. www.undelete-plus.com ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.

लॅपटॉप घेताय?



लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? मग जरा थांबा... उगीच घाई करू नका. लॅपटॉप घेताना फक्त किंमत कमी आहे या निष्कर्षावर खरेदी केली जाते. त्यामुळे नंतर पस्तावण्याखेरीज काहीच उरत नाही. तशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ही चेकलिस्ट...

स्क्रीन क्वॉलिटी :
लॅपटॉपची स्क्रीन ही ग्लॉसी आणि मॅट अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. मॅन्युफॅक्चरर हल्ली बऱ्याचदा ग्लॉसी प्रकारचे लॅपटॉप बनवतात. हे ग्लॉसी लॅपटॉप सिनेमा बघण्यासाठी ठीक आहेत. पण, रोजचं ऑफिसवर्क करण्यासाठी हे लॅपटॉप कुचकामी ठरतात. ग्लॉसी स्क्रीनमुळे डोळ्यावर अकारण ताण पडतो. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी लॅपटॉप घेत असाल, तरच ग्लॉसी स्क्रीन घ्या.

नेटवर्क कनेक्टिविटी :
बऱ्याच लॅपटॉपमध्ये इनबिल्ट वायरलेस नेटवर्क कनेक्टिविटी असते. पण फक्त एवढ्या आश्वासानावर भुलू नका. ही कनेक्टिविटी कोणत्या प्रकारची आहे ती समजून घ्या. अनेकदा यासाठी जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यामुळे इण्टरनेट आणि नेटवर्क कनेक्टिविटी स्लो होते. तसंच ही वायरलेस कनेक्टिविटी नंतर बदलता येत नाही. म्हणून लॅपटॉप घेण्यापूवीर्च ती अपग्रेडेबल आहे की नाही, याची काळजी घ्या. सध्या ८०२.११ एन ही वर्जन योग्य आहे, असं म्हणता येईल.

रफ अॅण्ड टफ होगा तो बेहतर है :
सध्या लॅपटॉपचा बाजार गरम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसोबत अनेक लोकल ब्रॅण्डही या स्पधेर्त जोमाने उतरलेत. अनेकांनी आपल्या किमती खूप खाली आणल्या आहेत. पण या उतरलेल्या किमतीत लॅपटॉप घेताना आपण कुठे क्वालिटीशी तडजोड करत नाहीत ना, याची काळजी घ्या. लॅपटॉप ही गोष्ट अशी आहे, जी घेऊन आपल्याला प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यासोबत मिळणाऱ्या अॅक्ससरीज काय आहेत त्या पाहा. आपला लॅपटॉप फार नाजूक असून चालणार नाही हे लक्षात घ्या.

डोकं तापवू नका आणि लॅपटॉपही... :
लॅपटॉप मॅन्युफॅक्चरर हे आपल्या प्रोडक्टची जाहिरात करताना पॉवरफुल प्रोसेसर, फास्ट हार्ड डिस्क, हेवी बॅटरी अशी करतात. पण या साऱ्यामुळे लॅपटॉप तापतो हे आपल्याला सांगितलं जात नाही. त्यामुळे काही तासांच्या वापरानंतर लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. आता बाजारात चांगल्या क्वालिटीचे असे लॅपटॉप मिळतात, की ज्यात उष्णतारोधक तंत्र वापरलेलं असतं. त्यामुळे लॅपटॉप घेण्यापूवीर् फक्त डीलर काय म्हणतो ते ऐकू नका, तो वापरणाऱ्या एकाचा तरी सल्ला घ्याच.

लॅपटॉपचा आवाज बंद करा :
आपण एवढ्या दमड्या मोजून लॅपटॉप घ्यायचा आणि वर त्या लॅपटॉपचाच आवाज ऐकायचा हे कोणाला आवडेल? पण कुलिंग फॅन आणि हार्ड ड्राइव्हच्या लोच्यामुळे अनेकदा लॅपटॉप आवाज करतो. कधीकधी ही भुणभुण एवढी इरिटेटिंग ठरते की त्यातून डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणूनच लॅपटॉप घेतानाच या गोष्टीची काळजी घ्या. आपल्याला लॅपटॉप घ्यायचाय डोकेदुखी नको!

Monday, 23 April 2012

SUPERAntiSpyware

Superantispy, Adware, Trojans, Worms, Keyloggers
जर तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर वायरस शिवाय अनेक धोके तुमच्या कॉम्प्यूटर सोबत नुकसान करू शकतात. 
म्हणून एंटी वायरस शिवाय अजुन एक सुरक्षा औजार येथे देत आहोत.

जो तुमच्या कॉम्प्यूटर सुरक्षित ठेवेलाच सोबत तुमचा ख़राब झालेला कॉम्प्यूटर चांगला करायला मदत करेल.
हा नविन हत्यार आहे SUPERAntiSpyware 5.0.1134 Final.
हे नविन वर्जन पहिल्यापेक्षा आकर्षक आणि गतिमान आहे.

हे सोफ्टवेअर browser hijacker पासून तुमच्या कॉम्प्यूटर ला वाचवेल जे तुमच्या कॉम्प्यूटर मध्ये होमपेज, सर्च इंजन किंवा टूलबार इंस्टोल करतात.


या नविन वर्जन ने तुम्ही पूर्ण कॉम्प्यूटर, किंवा एखादा ड्राइव किंवा फोल्डर स्कैन करू शकता.
सोबतच तुमचा मोबाईल फोन पण स्कैन करू शकता ज्याने तुमचा मोबाइल पण सुरक्षित राहील.
हे सोफ्टवेअर १२ एमबी आकाराचे आहे.
.
.
.
.
हे सोफ्टवेअर Spyware, Adware, Trojans, Worms, Keyloggers पासून तुमचा कॉम्प्यूटर सुरक्षित ठेवेल.
.
.

खलील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे सोफ्टवेअर डाउनलोड करून घ्या.
.
.
.

How to Repair windows in Marathi


किती तरी वेळा आपण कंप्युटर खराब झाल्याने आपला किमती वेळ आणि डाटा वाया जातो. कंप्युटरच्या खराबिला चांगले करण्यासाठी कधी कधी फोर्मेट शिवाय पर्याय नसतो. पण आता एक मोफत पोर्टेबल टूल जो कंप्युटर ठीक करण्यासाठी मदत करेल.

या टूलचे नाव आहे Windows Repair आणि हा नावा प्रमाणे तुमचा कंप्युटर रेपेयर करतो.
यामध्ये तुम्ही ५ सोप्या टप्प्यात तुमचा कंप्युटर ठीक करू शकाल.

पहिल्या टप्प्यात तुम्ही व्हायरसने निर्माण झालेली खराबी ठीक करू शकाल पण जर तुम्ही अगोदरच चांगला एन्टीव्हायरस वापरत असाल तर तुम्ही सरळ दुसरा टप्पा सुरु करू शकता.

दुसऱ्या टप्प्यात डिस्क चेक, तिसरयात सिस्टीम फाईल चेक, चौथा सिस्टीम रेस्टोर पोइन्ट.
Windows Repair and Restore
लक्षात ठेवा या टूलचा वापर करताना विंडोज एक्सपी तुम्ही वापरत असाल तर विंडोज एक्सपीच्या सीडी तयार ठेवा कारण याची गरज भासू शकते.

कंप्युटर फोर्मेट करण्या अगोदर शेवटचा पर्याय म्हणून या टूलचा वापर करून पहा. हा पोर्टेबल टूल असल्याने सेफमोड मध्ये विना इंस्टाल करताही तुम्ही वापरू शकता.

Thursday, 19 April 2012

काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट



१. www.statusdetect.com  -  या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य'  असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता.

२. www.yahoo.com  -  या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्‍याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर  yahoo.com  अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा.

. www.easycalculation.com  -  या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता.

४. www.transferbigfiles.com  -  या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता.

५. www.downforeveryoneorjustme.com  - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता.

६. www.dontclick.it  -  इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे.

७. www.pimpmysearch.com  -  या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल

८. www.cooltoad.com  -  जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो.

९. www.meebo.com  -  याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते.

१०. www.howstuffworks.com  -  सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे.

११.  www.ehow.com  -  एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे.

१२.  www.bugmenot.com  -  बर्‍याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते.

१३. www.computerpranks.com -  कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.

सीडी राईट कशी करावी?


सीडी राईट कशी करावी, म्हणजेच आपल्या कॉम्पुटरमधिल माहिती सीडीवर कशी साठवावी.
तुमच्या कॉम्पुटरवर तुम्ही सीडीवरील गाणी, पिक्चर पाहू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये सीडी राईट देखिल करु शकता, सीडी राईट करण्यासाठी सीडी ड्राईव्हर हा सीडी राईटर असायला हवा. शक्ततो त्या सीडी ड्राईव्हरवर 'Recorder/Re-Writable/Writer' असे लिहिलेल असल्यास तुम्ही त्यावर सीडी राईट करु शकता.

विंडोज मध्ये सीडी राईट करण्यासाठी स्वतःचा सीडी राईटींचा प्रोग्राम आहे, परंतू त्यामध्ये काही आवश्यक गोष्टी नसल्यामूळे सीडी राईट करण्यासाठी 'Nero' हा स्वतंत्र प्रोग्राम जास्त प्रसिद्ध झाला. जास्तीत जास्त ठिकाणी 'Nero' हाच प्रोग्राम सीडी राईट करण्यासाठी वापरला जात असल्याने आपणदेखिल तोच प्रोग्राम कसा वापरायचा ते पहाणार आहोत.

टिप : 'Nero' या एकाच प्रोग्राममध्ये सीडी राईट केल्यास ती सीडी इतर ठिकाणी दुसर्‍या कॉम्पुटरवर देखिल 'Nero' या प्रोग्रामद्वारे पून्हा-पून्हा ती सीडी राईट करु शकता.

'Nero' प्रोग्रामद्वारे सीडी राईट केरण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
तुमच्या कॉम्पुटरमध्ये 'Nero' प्रोग्राम असल्यास रिकामी सीडी (Blank CD) कॉम्प्युटर मध्ये टाकताच एका छोट्या चौकोनात ती सीडी 'Nero' प्रोग्रामद्वारे राईट करायची आहे का? असा संदेश येईल, त्यावर क्लिक करताच 'Nero' प्रोग्राम आपोआप सुरु होईल.



१. आपणास जर कॉम्पुटरमधिल एखादी माहिती अथवा एखादी फाईल सीडीवर राईट करायची असेल तर त्या चौकोनातील वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Data' या विभागावर माऊस न्या आणि त्याच विभागातील 'Make Data CD' या उपविभागावर क्लिक करा.


 
२. आता पुढील चौकोनात वर उजव्या बाजूला 'Add' असे बटण दिसेल. सीडी मध्ये ज्या फाईल्स राईट करायच्या आहेत त्या निवडण्यासाठी इथे क्लिक करा.



३. 'Add' या बटणावर क्लिक करताच 'Select Files and Folders' असा एक छोटा चौकोन समोर येईल. त्यामध्ये आपणास हव्या असलेल्या फोल्डर मधून आपणास हव्या असलेल्या फाईल्स निवडाव्या व खालिल 'Add' व नंतर 'Finished' ह्या बटणावर क्लिक करावे.



४. आता मगाचचाच चौकोन आपल्या समोर येईल ज्यामध्ये आपण निवडलेल्या फाईल्स असतील, तसेच त्या सर्व फाईल्सना एकुण किती जागा लागली आहे हे देखिल त्याच चौकोनात दिलेले असेल. आता पूढे जाण्यासाठी 'Next >' ह्या बटणावर क्लिक करा.



५. आता या पुढिल चौकोनात
* तुम्हाला त्या सीडीला काय नाव 'Disc name' द्यायचे आहे?,
* ती किती स्पिडला 'Writing Speed' राईट करायची आहे? (शक्यतो हा स्पिड '16x (2,400KB/s)' द्यावा, जेणे करुन ती सीडी सर्व कॉम्प्युटर्सवर चालेल.),
* तसेच 'Allow files to be added later (multisession disc)' म्हणजेच ती सीडी पून्हा-पून्हा राईट करुन वापरायची असल्यास त्या पुढील चौकोनावर क्लिक करावे.
या सर्व गोष्टी दिल्यानंतर खालिल ' Burn ' ह्या बटणावर क्लिक करावे.



६. आता आपल्यासमोर सीडी राईट करण्याची प्रक्रिया सुरु होईल.



७. सीडी पूर्ण राईट होताच आपल्यासमोर ' Burn process completed successfully at 16x (2,400 KB/s) ' असा संदेश येईल, तीथे ' OK ' वर क्लिक करा. बस्स असे करताच आपली सीडी राईट होवून आपोआप बाहेर येईल.

८. आता इथे पुन्हा एकदा तोच चौकोन येईल त्यावरील ' Next ' ह्या बटणावर क्लिक करा.



९. आता या शेवटच्या चौकोनामध्ये कॉम्पुटर आपणास ' Exit ' असे विचारेल त्यावर क्लिक करा आणि तो प्रोग्राम बंद करा.


कॉम्प्युटर स्क्रीनशॉट

कॉम्प्युटर वापरत असताना भरपूर उपयोगी सॉफ्टवेअर वापरून आपण आपले कम लवकर आणि सहज करू शकतो. बरयाच वेळा आपल्याला काही कामासाठी स्क्रीनशॉट घ्यावा लागतो.
अश्या वेळी आपण किबोर्ड वरील प्रिंटस्क्रीन बटन दाबतो.
पण त्याने संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट येतो.
तसेच विडियो फॉर्मेट मध्ये स्क्रीनशॉट घेता येत नाही.
यावर उपाय आहे

Jing Screenshot Plugin software.
या सॉफ्टवेअर च्या मदतीने तुम्ही हवे तसे स्क्रीनशॉट घेऊ शकता.
वेबसाईटचा  तुम्हाला जेवढा भाग shot करायचा आहे फक्त तेवढाच भागाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
तसेच तुम्ही विडियो स्क्रीनशॉट देखिल घेऊ शकता.
या मध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ज्याकाही एक्शन कराल तेवढ्या विडियो मध्ये शूट होतील.
याचा वापर तुम्ही एखादी गोष्ट कोणाला समजवान्यसाठी देखिल करू शकता कारन विडिओ मध्ये पाहून 
कोणतीही गोष्ट लवकर समजते
तसेच इमेज स्क्रीनशॉट घेउन तुम्ही त्यावर नोंद लिहू शकता
हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.
.
.